You are currently viewing सोज सकाळी कामावर

सोज सकाळी कामावर

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी संजय धनगव्हाळ यांची काव्यरचना

सोज सकाळी कामावर
गेलेला तिचा नवरा
संध्याकाळी दारु पिऊन यायचा
उरलेले पैसे प्रामाणिकपणे
तिच्या हातात ठेवायचा
तो नशेत असतानाही
ती त्याच्या सोबत
जेवायला बसायची
शहाणपण शिकवताना
त्याच्या हातचा मार खायची

रोज होणाऱ्या
अत्याच्याराची तिला
सवय झाली होती
आरडाओरडा न करता
सारकाही सहन करत होती
तो मध्यरात्री उठून
तिच्या जखमांवर
मलम लावायचा
तिच्या अंगावर पांघरूण
टाकताना
डोक्यावरून हात
फिरवायचा

मार खाऊन सुद्धा ती
डबा बनवून त्याच्या
हातात द्यायची
त्याचा निरोप घेताना
लवकर येण्याच आवर्जून
सांगायची
तो तिच गोड हसु पाहूनचं
घराबाहेर पडायचा
त्याने मागेवळून
पाहिल्यावरच तिचा
घरात प्रवेश व्हायचा

तो पुन्हा झिंगत झांगत
घरी यायचा
त्याची अवस्था पाहून
दोघांमध्ये वाद व्हायचा
त्याचा तोल गेल्यावर
ती त्या सांभाळून घ्यायची
तो तिच्या कुशीत झोपताना
ती त्याचे पाय दाबून
द्यायची

असे कितीतरी
वेदनादायी व्रण
तिच्या अंगावर होती
त्याच्या स्पर्शाशिवाय
ते ही बरे होत नव्हती
रोज भांडण करूनही
एकमेकांची काळजी घ्यायचे
अश्रु पुसताना
डोळेभरून पहायचे

जगणे त्यांचे
कसेही असले तरी
कोणी कुणालाही
अंतर देत नव्हते
एकमेकांसाठी जगताना
त्यांच एकमेकांवर
खूप प्रेम होते

*संजय धनगव्हाळ*
९४२२८९२६१८

प्रतिक्रिया व्यक्त करा