You are currently viewing चांदण्यात फिरतांना …

चांदण्यात फिरतांना …

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांची अप्रतिम काव्यरचना

प्रेमिका रे चल तेथे ….
विरघळते जिथे चांदणे……..
स्वप्निल त्या दुनियेची होईन मी चांदणी
चंद्र सख्या शीतलसा अंगी मज गोंदणे…
प्रेमिका रे चल तेथे…….

दुनिया ती दोघांची नक्षत्रांचीच घरे
हंड्या नि झुंबर ते सारे बघ ग्रह तारे
होऊन बघ स्वारच मग धुमकेतूवर फिरणे…
प्रेमिका रे चल तेथे…..

ढग पालखीत रोज वाऱ्यावर होत स्वार
भाग्यवंत मी किती ठरणार बघ नार
क्षितिजावर रंगातच रोज पहा झुलणे…
प्रेमिका रे चल तेथे …

दंवबिंदू अन् धुके पांघरून छान शाल
पूर्वेचा तो गुलाल आरक्त होतील गाल
रथ सूर्याचाच बघ जोडूनी त्या “हरणे “
प्रेमिका रे चल तेथे …..

स्वप्नमयी दुनियेची सुंदरशी कल्पना
कल्पिताच वाटते बघ किती छान ना
चंद्र चांदण्यात न्हात काळालाच विसरणे …
प्रेमिका रे चल तेथे…
विरघळते …जिथे चांदणे …

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : १७ मे २०२२
वेळ : सकाळी १० : २९

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × three =