You are currently viewing इचलकरंजीत सोमवारी राज्यस्तरीय कुस्ती निवड चाचणी स्पर्धा

इचलकरंजीत सोमवारी राज्यस्तरीय कुस्ती निवड चाचणी स्पर्धा

उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अमृत भोसले यांची माहिती

 

इचलकरंजी :

इचलकरंजी येथील व्यंकोबा कुस्ती मैदान येथे कुस्तीचे आश्रयदाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त सोमवार दि.१६ मे रोजी १५ वर्षाखालील राज्यस्तरीय कुस्ती निवड चाचणी स्पर्धा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धा इचलकरंजी नागरपरिषद आयबेन स्टॉक प्रायव्हेट लिमिटेड ,रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंटर, कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशन, यशवंतराव चव्हाण सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त सहकार्याने होणार असल्याची माहिती उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अमृत भोसले यांनी पञकार बैठकीत बोलताना दिली.

 

करवीर संस्थानचे अधिपती राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कुस्ती कलेला मोठा राजाश्रय मिळवून दिला.यंदाच्या वर्षी त्यांच्या स्मृती शताब्दी दिनानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.त्याचाच एक भाग म्हणून इचलकरंजी नागरपरिषद आयबेन स्टॉक प्रायव्हेट लिमिटेड ,रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंटर, कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशन, यशवंतराव चव्हाण सहकारी पतसंस्था या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने व्यंकोबा मैदान येथे सोमवार दि.१६ मे रोजी १५ वर्षाखालील राज्यस्तरीय कुस्ती निवड चाचणी स्पर्धा होणार आहेत. यामध्ये फ्री स्टाईल राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा प्रथमच होत आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्यभरातून ५५० पेक्षा जास्त पैलवानांची नोंद झाली आहे. १० वजन गटामध्ये ३४ किलो ,४१ किलो ,४४ किलो ,४८ किलो ,५२ किलो ,५७ किलो ,६२ किलो ,६८ किलो ,७५ किलो ,८५ किलो या गटांचा समावेश आहे. यातून ज्या

पैलवानाचा प्रथम क्रमांक येईल त्याची रांची येथील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड होणार आहे. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पंच महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्यातून येणार आहेत. तसेच कुस्तीगीर परिषद व कोल्हापूर जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मुख्य म्हणजे या निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे ,खा. धैर्यशील माने, माजी आमदार सुरेश हाळवणकर , युवा नेते पृथ्वीराज महाडिक, माजी आमदार अशोक जांभळे, सतीश डाळ्या , मदन कारंडे, महावीर गाट, रवींद्र माने यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.तरी या कुस्ती स्पर्धेचा इचलकरंजी परिसरातील कुस्ती शौकिनांनी लाभ घ्यावा ,असे आवाहन उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अमृत भोसले यांनी पञकार बैठकीत माहिती देताना केले.

यावेळी भाऊसो आवळे , अमित गाट, रवींद्र लोहार, भारत बोंगार्डे, अनिस म्हालदार. .पै.मोहन सादळे, पै. बंडा उगळे, पै. बाळू शिंदे, पै.बाळासो जाधव ,प्रा. रमेश चौगुले , पै. सहदेव माने, पै. बापू ऐकले , निवेदक सुकुमार माळी , जिवन बरगे, पै. अंकुश पसारे ,पै.युवराज मगदूम आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा