सिंधुदुर्ग जिल्हयात ग्रामपंचायती साठी मतदानाला सुरुवात…

सिंधुदुर्ग जिल्हयात ग्रामपंचायती साठी मतदानाला सुरुवात…

मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; काही ठिकाणी किरकोळ तांत्रिक अडचणी…

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी आज निवडणूक प्रक्रिया सकाळपासून सुरू झाली. सकाळच्या सत्रात मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी उत्साह दिसत होता. अनेक मतदान केंद्रावर मोठी गर्दी झालेली दिसत होती. किरकोळ तांत्रिक कारणे वगळता मतदान प्रक्रिया शांततेत सुरू होती. या मतदान प्रक्रियेसाठी तब्बल १ लाख ९ हजार १६२ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. यात ५४ हजार ५९ महिला तर ५५ हजार १०३ पुरूष मतदारांचा समावेश आहे. आजच्या निवडणूक प्रक्रियेत काही ठिकाणी किरकोळ तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचे दिसून आले. सकाळच्या सत्रात मतदानासाठी मतदारांचा उत्साह मोठा होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा