You are currently viewing पिंगुळीचे प.पु. विनायक उर्फ अण्णा महाराजांच्या पुतळयाचे सावंतवाडीत स्वागत

पिंगुळीचे प.पु. विनायक उर्फ अण्णा महाराजांच्या पुतळयाचे सावंतवाडीत स्वागत

सावंतवाडी

पिंगुळीचे प.पु. विनायक उर्फ अण्णा महाराज यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित त्यांच्या पुतळ्याची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार असून सावंतवाडीत अण्णा महाराजांच्या पुतळयाचे स्वागत करण्यात आले. हा पुतळा माजगाव-सावंतवाडीमार्गे पिंगुळीच्या दिशेने नेण्यात आला. 13 मे रोजी या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली जाणार असून सावंतवाडीत पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज पुतळ्यासमोर, चिटणीस नाका इथं अण्णा महाराजांच्या पुतळयाच स्वागत करण्यात आले. महाराजांच्या चरणी भाविक लीन झाले. यावेळी संत राऊळ महाराज सेवा ट्रस्टचे ज्येष्ठ कॉंग्रेस नेते, माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर, अतुल पेंढारकर, समीर वंजारी, ॲड. राघू नार्वेकर, माया चिटणीस यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा