You are currently viewing परुळे येथे महिला दिन उत्साहात साजरा

परुळे येथे महिला दिन उत्साहात साजरा

वेंगुर्ला / प्रतिनिधी :

 

परुळे युवक कला क्रीडा मंडळाच्या महिला विभागातर्फे परुळे येथे जागतिक महिला दिन उत्साहात पार पडला. या कार्यक्रमामध्ये मनोरंजक खेळाव्दारे मानसिक तणावातून मुक्ती या महिलांसाठीच्या विशेष कार्यक्रमात अनेक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग दाखवला. मानसिक तणाव वाढवणाऱ्या गोष्टी आणि त्या कशा टाळता येऊ शकतात याचं मनोरंजक खेळातून सुंदर मार्गदर्शन कुडाळ येथील बॕ.नाथ पै महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका कु. पियुशा प्रभू तेंडुलकर यांनी महिलांना करून दिल्या. त्याचबरोबर महिलांसाठी आयोजित पाककला स्पर्धेत अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. विस्तवाशिवाय केलेला पदार्थ या पाककला स्पर्धेच्या विषयात महिलांनी एकापेक्षा एक विविध सरस नावीन्यपूर्ण पाककृती सादर केल्या. सहभागी स्पर्धकांमधून पहिल्या चार क्रमांकांना पारितोषिके देण्यात आली. त्यामध्ये अनुक्रमे

सौ.सुजाता विष्णू माधव सौ.सानवी सचिन देसाई सौ.कविता अमेय जोशी सौ.दिनप्रभा दत्तगुरु सामंत या विजेत्या महिलांना इलेक्ट्रिक शेगडी, मिक्सर, प्रेशर कुकर आणि आपे मेकर ही बक्षिसे प्रदान करण्यात आली. तसेच उपस्थित महिलांमधून लकी ड्रॉ द्वारे तीन महिलांना आकर्षक भेटवस्तूही देण्यात आल्या. ही सर्व बक्षिसे परुळे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री.प्रसाद पाटकर यांनी पुरस्कृत केली होती.पाककला स्पर्धेचे परीक्षण सामंत बिच रिसाॕर्टचे श्री.सुरज सामंत आणि माचली रिसाॕर्टच्या सौ. अर्चना सामंत यांनी पार पाडले. महिला दिनाचे औचित्य साधुन गेलीअनेक वर्षे स्वतःच्या हाॕटेल व्यवसायात कार्यरत असलेल्या उद्योजिका श्रीमती. काशीबाई बाबूराव सावंत आणि सौ. नम्रता नितीन तेली यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसचालन सौ.पूर्वा नाईक, प्रास्ताविक सौ.प्राजक्ता सामंत आणि आभार प्रदर्शन सौ.रश्मी सामंत यांनी केले. यावेळी मंडळाच्या महिला विभागाच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 4 =