You are currently viewing युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी किरण टेंबुलकर यांची नियुक्ती…

युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी किरण टेंबुलकर यांची नियुक्ती…

देवगड

युवक जिल्हा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी किरण टेंबुलकर यांची प्रदेश काँग्रेसच्यावतीने निवड करण्यात आली आहे. यामुळे देवगड काँग्रेसच्यावतीने फटाक्याची आतषबाजी व घोषणाबाजी करीत टेंबूलकर यांच्या निवडीमुळे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्षपदासाठी काँग्रेस पक्षांतर्गत जिल्हयामध्ये ऑनलाईन पध्दतीने मतदान घेण्यात आले होते. यामध्ये युवक काँग्रेसचे जिल्हयामधील अध्यक्षपदासाठी किरण टेंबुलकर सह पाच उमेदवार उभे होते. यामधील सर्वाधिक मते हि किरण टेंबुलकर यांना ऑनलाईन पध्दतीने मिळाल्यामुळे त्यांची जिल्हा काँग्रेस युवक अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी देवगड पत्रकार परिषदेमध्ये बोलताना नुतन जिल्हायुवक अध्यक्ष किरण टेंबुलकर म्हणाले की, राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्हयातील युवकांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत. युवकांची बेरोजगारी हटवून उदयोग धंदयांच्या माध्यमातून युवकांना रोजगार कसा उपलब्ध होईल व युवकांच्या हाताला काम कसे मिळेल.

या दृष्टीकोनातून प्रामुख्याने आपली वाटचाल असणार आहे. तसेच युवक काँग्रेस प्रदेश कार्यालयाने आपल्यावरती टाकलेली जबाबदारी सार्थकि लावून जिल्हयामध्ये पक्षवाढीच्या दृष्टीकोनातून देखील आपण प्रयत्न करणार आहोत. आगामी पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडुकांमध्ये जिल्हयामध्ये जास्तीत जास्त पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य काँग्रेस पक्षाचे निवडुन आणण्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. सदया महाविकास आघाडीला जिल्हयामध्ये पोषक असे निवडणुकिसाठी वातावरण असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष उल्हास मणचेकर,सुगंधा साटम,उमेश कुलकर्णी,युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुरज घाडी, सुरेश देवगडकर,सज्जाउदिदीन सोलकर, रशिद खान आदी उपस्थित होते. यावेळी देवग्ड मांजरेकर नाका येथे फटाक्यांची आतषबाजी व घोषणा देत नुतन जिल्हायुवक अध्यक्ष किरण टेंबुलकर यांचे अभिनंदन करुन जल्लोष साजरा करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − seven =