You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील विविध योजनांचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील विविध योजनांचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा…

बांदा सोसायटीने योजना राबविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे…

बांदा

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना असून शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा. दुग्ध उत्पादन वाढीसाठी जिल्हा बँक नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील, यासाठी बांदा सोसायटीने शेतकऱ्यांना योजना राबविण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी येथे केले.

श्री सारंग यांनी येथील विकास सोसायटीला भेट देत नूतन संचालक मंडळाचे अभिनंदन केले. यावेळी सोसायटी अध्यक्ष घनश्याम बांदेकर, उपाध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी श्री सारंग यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा बँकेच्या विविध लोकोपयोगी योजनाची माहिती सारंग यांनी उपस्थिताना दिली.

यावेळी संचालक आदाम बाबा आगा, संजय चांदेकर, आप्पाजी देसाई, भिकाजी धुरी, सुभाष परब, लक्ष्मण सावळ, अर्चना आंबेलकर, कामिनी कुडव, देऊ मळगावकर, जानू बुटे, लक्ष्मण जाधव आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा