You are currently viewing सनातन संस्थेच्या वतीने सावंतवाडीत आज “हिंदू एकता दिंडीचे” आयोजन…

सनातन संस्थेच्या वतीने सावंतवाडीत आज “हिंदू एकता दिंडीचे” आयोजन…

सनातन संस्थेच्या वतीने सावंतवाडीत आज “हिंदू एकता दिंडीचे” आयोजन…

सावंतवाडी

सनातन संस्थेच्या वतीने हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी अखंड कार्यरत असलेले सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण भारतात “हिंदूराष्ट्र-जागृती अभियान” राबवले जात आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून तसेच हिंदूंमधील ब्राह्मतेज वाढवून त्यांना हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्यरत करण्यासाठी सावंतवाडी शहरात आज  दि. १४ मे या दिवशी सायंकाळी ३:३० वाजता भव्य हिंदू एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या हिंदू एकता दिंडीला येथील गवळी तिठा येथून प्रारंभ होणार असून आत्मेश्वर मंदिर, उभा बाजार, गांधी चौक, मुख्य बाजारपेठ, मिलाग्रीस हायस्कूल ते पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी नगरपरिषद, श्रीराम वाचन मंदिर, या मार्गाने जाऊन येथील बस स्थानकाजवळ दिंडीची सांगता होणार आहे. समस्त हिंदूंनी मोठ्या संख्येने या हिंदू एकता दिंडीमध्ये सहभागी व्हावे, असे आव्हान सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 5 =