You are currently viewing आ.नितेश राणे यांच्या सूचनेनुसार तालुकावार आर.टी.ओ कॅम्प सुरू

आ.नितेश राणे यांच्या सूचनेनुसार तालुकावार आर.टी.ओ कॅम्प सुरू

देवगड प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्हा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्थात आरटीओ यांनी अखेर जिल्हावार आरटीओ कॅम्प सुरू केले असल्याने जनतेने सुटकेचा श्वास सोडला आहे आमदार नितेश राणे यांनी पत्र देऊन हे आरटीओ कॅम्प तातडीने सुरू करा अशी मागणी केली होती

देवगड साठी आरटीओ कॅम्प सुरू करा अशी मागणी केली असली तरी याचा फायदा संपूर्ण जिल्ह्याला झाला असून आता जिल्हावार आरटीओ कॅम्प सुरू झाल्याचे परिपत्रक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे यांनी निर्गमित केले आहे

कोविडचे कारण देत जिल्ह्यात तालुकावार होणारे सर्व आरटीओ कॅम्प बंद करण्यात आले होते. लाट ओसरली तरी हे कॅम्प सुरू करायला सरकार परवानगी देत नव्हते यामुळे वाहनचालकांची ससेहोलपट होत होती अनेक वाहनचालकांची नोंदणी प्रशिक्षणे व परवाने ही कामे अडकली होती

याबद्दल वारंवार आमदार नितेश राणे यांच्याकडे तक्रारी जात होत्या यावर आमदार नितेश राणे यांनी जिल्हा परिवहन अधिकाऱ्यांना पत्र लिहून याबाबत तातडीने हे कॅम्प सुरू करावेत अशी मागणी केली होती
आमदार नितेश राणे यांचे पत्र जाताच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री काळे यांनी आमदार नितेश राणे यांना आपण आरटीओ कॅम्प सुरू करत असल्याचे सांगितले होते

याचे परिपत्रक त्यांनी लागू केले असून देवगड चार मे व एक जून वैभव वाडी येथे पाच मे व दोन जून मालवण येथे 10 मे व सात जून वेंगुर्ला येथे 11मे व आठ जून सावंतवाडी येथे 18 मे व 15 जून तर दोडामार्गात 19 मे व 16 जून या कालावधीत कॅम्प होणार आहेत आमदार नितेश राणे यांनी या केलेल्या कामाबद्दल सर्व वाहनचालक त्यांचे आभार व्यक्त करत आहेत

प्रतिक्रिया व्यक्त करा