You are currently viewing पणदूर ग्रामपंचायतीत जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

पणदूर ग्रामपंचायतीत जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

पणदूर :

 

ग्रामपंचायत कार्यालय पणदूर येथे 8 मार्च व 9 मार्च 2023 रोजी महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मा. सरपंच पल्लवी पणदूरकर, उद्घाटन उर्मिला उमेश यादव सहा.निबंधक सह. संस्था कुडाळ यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे श्री विजय चव्हाण गटविकास अधिकारी प.स कुडाळ, श्रीमती आठले मॅडम, श्रीमती.पठाडे मॅडम, सौ.रुची राऊळ, माजी जि.प सदस्य श्री.नागेंद्र परब, माजी सरपंच दादा साईल, तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत साईल, माजी सरपंच श्री शिवराम पणदूरकर, माजी सरपंच श्री शामसुंदर सावंत, श्री.अनंत टंगसाळी, श्री धोंडी सोमा साईल, श्री. साबाजी सावंत, श्री संजय सावंत, श्री बापुजी सावंत, ग्रा.पं उपसरपंच साबाजी मस्के, ग्रा.प सर्व सदस्या ऐश्वर्या टंगसाळी, सौ. अपर्णा साईल, श्री.उल्हास पणदूरकर, सौ.संगिता साईल, श्री महादेव सावंत, सौ किशोरी जाधव, मुख्याध्यापिका सौ. दिपश्री परब, शिक्षिका सौ. संगिता राऊळ, पोलीस पाटिल देऊ सावंत, ग्रामसेवक सपना मसगे तसेच ग्रामपंचायत सर्व कर्मचारी, गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

सदर कार्मक्रमात होतकरु महिला आशा सेविका सौ.निकिता कमलाकर साळंखे यांचा सत्कार करण्यात आला.

8 मार्च रोजी खास महिलांसाठी अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

पाककला स्पर्धेमध्ये सहभाग महिला 48

पाककला स्पर्धा निकाल

प्रथम क्रमांक : सिद्धिका गणेश बागायतकर

द्वितीय क्रमांक : ज्योती प्रकाश गोसावी

तृतीय क्रमांक : रसिका राजाराम गोसावी

चौथ क्रमांक : निशा तुषार चोरगे

पाचवा क्रमांक : पार्वती महादेव पणदूरकर

संध्याकाळी महिलांसाठी खास आकर्षण पैठणीचा खेळ सहभाग महिला 105 नागेश नेमळेकर यांच्या उपस्थित सदर कार्यक्रमासाठी तिन्ही पैठणी या पणदूर गावचे सुपुत्र श्री. शरद साईल यांच्या हस्ते स्पॉनसर

प्रथम : सौ.मानसी गोसावी

द्वितीय : सौ.भाग्यश्री भिवा पणदूरकर

तृतीय : सौ. जुई शेर्लेकर

संध्याकाळी गावातील महिलांचे 20 सामुहिक सांस्कृतिक कार्यक्रम

दिनांक 09 मार्च 2023 रोजी

सकाळी ग्रामपंचायतच्या वतीने आरोग्य मेळावा घेण्यात आला सदर आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन प्रा.उपकेंद्र डॉ.माळी, उपस्थित डॉ. गंगावणे, डॉ. सावंत, आरोग्य सेवक एस. पी. धामणकर, आरोग्य सेविका व्ही. आर. धर्णे, एम. एन. गोसावी, आर. पी. चव्हाण, यांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्यात जेष्ठ नागरीकांसाठी नेत्र तपासणी, स्त्रीयांसाठी स्त्री रोग तपासणी.

फुगडी स्पर्धेमध्ये सहभागी गट 05

परिक्षक : सौ. प्राची राणे, श्री. भुषण तेजम

फुगडी स्पर्धा निकाल –

प्रथम क्रमांक : श्री देव भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ कुडाळ भैरववाडी 5000/- आकर्षक चषक मंदार कोळावळे स्पोनसर

द्वितीय क्रमांक : सखी फुगडी संघ पावशी 3000/- आकर्षक चषक श्रीमती ययाती देसाई स्पोनसर

तृतीय क्रमांक : पाटेकर फुगडी संघ पणदूर सावंतवाडा 2000/- आकर्षक चषक श्री.अनंत टेगसाळी स्पोनसर

सदर कार्यक्रमास उत्सुक्तपणे आर्थीक सहभाग म्हणून मा.जि प सदस्य अमरमेन सावंत, मा. ग्राप माजी सरपंच दादा साईल सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × three =