You are currently viewing बोलले मज पंढरीनाथ

बोलले मज पंढरीनाथ

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी श्री अरविंद ढवळीकर यांची अप्रतिम काव्यरचना

 

*बोलले मज पंढरीनाथ*

 

खरे सांगतो आलो नसतो परतुनी मी येथ

ब्राह्मण सांगे कान्होपात्रे झाला जो दृष्टांत

बोलले मज पंढरीनाथ

 

हा मंगळवेढा गाव सोडता

मनी पापाचा पगडा सारा

पंढरी च्या वारीवर असता

कलावन्तिणी घरी आसरा

विसरलास का निरोप द्याया पुसती भगवंत

बोलले मज पांढरीनाथ

 

तिचा अश्रूअभिषेक पाऊली

आठवतो मज सदैव अजुनी

झाली जरी एकादशी शयनी

निद्रा नच अवतरली नयनी

सांगावा द्या वाट पाहतो हा रुक्मिणी कांत

बोलले मज पंढरीनाथ

 

मज आठवतो वारकरी तों

मार्गी अवचित कसा भेटतो

तुळस मंजिरी माळ ठेवुनी

भेटीची जणू खूण सांगतो

कार्य हरीचे घडले हातून मनी न आता खन्त

बोलले मज पंढरीनाथ

 

स्मरणी कान्हाईस जे स्वप्नी

हरी चरणा भिजविले अश्रुनी

शब्द बोलले आलीस का तू

उभे विटेवरी तरीही वाकूनी

माते सह चालली पंढरी नाही जिवा उसंत

बोलले मज पंढरीनाथ

 

अरविंद

9/6/21

प्रतिक्रिया व्यक्त करा