You are currently viewing साहित्य संमेलन आणि साहित्य चळवळ’

साहित्य संमेलन आणि साहित्य चळवळ’

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी संजय धनगव्हाळ यांचा लेख

‘साहित्य संमेलन आणि साहित्य चळवळ’
(संजय धनगव्हाळ)

साहित्य संस्कृतीचा वारसा लाभलेल्या उदगीर येथे ९५,अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच पार पडले.तसेच या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या साहित्य कला मंचच्या माध्यमातून संमेलन होत असतात पण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच महत्त्व काहीस वेगळच असते. कोकण,वऱ्हाड,खान्देश,ऊर्दू,ग्रामीण,बाल साहित्य,विद्रोही,नाट्य, दलित,कामगार,श्रमिक राज्यस्तरीय,असे अनेक साहित्य संमेलन जो तो आप आपल्या पध्दतीने कुवतीप्रमाणे घेत असतात पण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अनेकांना उत्सुकता लागलेली असते यासाठी आयोजक वर्षभर तयारी करत असतात.पण संमेलन का घ्यावीत या मागचा हेतू काय याचा विचार गांभीर्याने केला तर अनेक प्रश्नांचा उलगडा होवू शकतो.साहित्य क्षेत्रातील विचारवंताची देवाणघेवाण,नामवंत साहित्यिकाचे विचार त्यांच्या लिखानावर चर्चासत्र,परिसंवाद शिवाय प्रस्थापित व.नवोदित कवींना कविता सादरीकरणासाठी व्यासपीठ मिळत असते.
खरतर साहित्य संमेलन हे साहित्य आणि संस्कृतीचे एक अविभाज्य अंग आहे. साहित्य संमेलनामुळेच नवोदितांना लेखक कवींना लिहण्याची प्रेरणा मिळत असते.अनेकांशी ओळखी होतात विचारांची देवाणघेवाण शिवाय विविध प्रांतातील भाषेवरून साहित्याची ओळख होत असते यादरम्यान साहित्यक वातावरण जोपासणे साहित्यिक,गप्पा,चर्चा परिसंवाद,
याद्वारे साहित्यकांची साहित्यातील अभिरुची व रसिकता वाढवण्यासाठी संमेलन महत्वाची ठरतात.पण काय होत की अशा रसिकतेचा जोश साहित्य संमेलन घेण्यापूरताच दिसुन येतो.
त्यानंतर काय?आप आपल्या प्रांतातील साहित्यकांमधे उत्साह असलाही तरी पण अखिल भारतीयसाठी वेगळीच भुमिका साहित्यकांमधे दिसुन येते.समजूशकतो की साहित्य संमेलनामुळेच आपल्या भाषेच,साहित्य संस्कृतीच,संस्कारांच अस्तित्वत टिकून आहे.
भाषेला महत्त्व नसते तर कोणी लिहते झाले नसते,लिहते नसते तर संमेलन झालीच नसती.तेव्हा साहित्य संस्कृती टिकवून ठेवण्यसाठी साहित्य संमेलन गरजेची आहे. पण साहित्य संमेलन त्याच दिवसापुरता नसुन साहित्य संमेलन पुन्हा येणाऱ्या साहित्य संमेलना पर्यंत चळवळीच्या रूपाने अखंडपणे सुरु असली पाहिजे.अर्थात शाळा,कॉलेज,
महाविद्यालयात परिसंवाद,चर्चासत्र,स्पर्धा डिबेट,काव्य संवाद अभिवाचन,घेवून भाषेची आवड निर्माण करून नवोदितांना साहित्याशी जोडण्याची चळवळ सुरू ठेवली पाहिजे.माणसु जोडला गेला तर साहित्य टिकले म्हणजे भाषाही जिंवत राहीलं.आणि भाषा,साहित्य किंवा लिखाणाची आवड निर्माण करण्याच मोठं माध्यमचं अर्थात शाळा कॉलेज,महाविद्यालय आहे.हल्ली तर प्रत्येक जिल्ह्यात गावात,ग्रामीण भागातून साहित्यिक लिहतं आहेत. किंवा लिहणारे तयार होत आहेत.कोणी गझल तर कोणी कविता काही कथाकार उदयास आलेले दिसून येतात. सांगायचं झाल तर
साने गुरूजी बहिणाबाई, ना.धो महानोर,बालकवी ठोंबरे,प्र के अत्रे,ग दी मा, वि वा शिरवाडकर अशी बरीच नाव घेता येईलं. यांची साहित्य निर्मिती सुध्दा ग्रामीण भागातूनच झालेली आहे. या महाराष्ट्राच्या मातीत अनेक रत्न जन्माला येवून सर्वांनी आपल्या मातीशी साहित्याची नाड जोडून मराठी भाषा व मराठी साहित्याला समृद्ध केलेत. ही साहित्य चळवळ कवीसंमेलन व व्याख्यानच्या माध्यमातून सर्वदूर पसरवली.बहिणाबाईंच्या कविता आजही जीवंत वाटतात,बाल कवीचां निसर्ग,आजही त्याच्या कवितेतून डोकावतो.
साने गुरूजींची ‘शामची आई’आजही आपल्यात असल्याचे जाणवते.वि वा शिरवाडकरांची ‘विशाखा’ आजही अजरामर आहे.अशा महान विभूतींनी भाषेला साहित्याच्या प्रभूत्वाने मोठे करून ते कायम स्मरणात ठेवले.
पण सध्याची साहित्य संमेलन वादित झाली आहे.राजकारणाची सावली हल्लीच्या साहित्य संमेलनावर पडली असल्याकारणाने मोठ्या साहित्य संमेलनाला राजकीय आधार घ्यावा लगतो.ही आयोजकांची लाचारी म्हणावी अस मला वाटतं.मुळात साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर कोणत्याही राजकीय नेता नसावाचं यामुळे जे खरे साहित्य किंवा जाणकार लिहते आहेत ते मागे पडल्या सारखे वाटते.साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर मग ते कोणतेही व कधीही केव्हाही होणारे संमेल असोत तिथे फाक्त साहित्यिकच असावा. कोणत्याही राजकीय राज्यकर्ता नसावा.
प्रत्येक साहित्य संमेलनात प्रस्थापिताना व्यासपीठ मिळते पण जे नवोदित आहे नवीन लिहते आहे अशांनाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सक्रिय सहभाग द्यावा.काही जेष्ठ आहेत अशाना अध्यक्षपदाच मान देवून त्यांनाही मोठ केले तर जे पिढ्यानपिढ्या तेच तेचं साहित्य संमेलनाचे आयोजक आहेत त्यांचाही मोठेपणा अनेकांना दिसून येईल.साहित्य संमेलनाची एखादी निवड समितीवर प्रत्येक जिल्हातील व ग्रामीण भागातील कवीनाही घेतले तर बहुतांश कविंना प्रेरणा मिळेल.गावागावातून चांगले कवि उदयास येतीलं.व नवनवीन साहित्यिकाच्या हाती संमेलनाची सुत्र सोपवली तर खऱ्यार्थाने साहित्य संमेलनाला योग्य दिशा मिळेलं.पण राजकीय निधीच्या आधारे साहित्य संमेलन होतात म्हणून अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या मंचावर तितकाच तोलामोलाच्या व्यक्तीला व्यासपीठावर बसवतात.राजकीय नेत्यांची उपस्थिती म्हणजे मराठी साहित्य पोरके झाल्या सारखे वाटते.खरतर साहित्यसंमेलन आणि राजकारण ही दोघही विरूद्ध टोकं एकमेकांन जवळ यायला नकोत साहित्य मंच हे खूप पवित्र स्थान आहे.पण या राजकीय नेत्यांमळे साहित्य संमेलन गढूळ झाल्यासारखी वाटतात.
निधी मिळतो म्हणून अवाजवी खर्च वाढतो. निधी मिळालेला असतांनाही आलेल्या साहित्यकांची प्रचंड प्रमाणात गैरसोय होतेच शिवाय गैरसोय होवू द्यायची नसेल तर येणाऱ्या साहित्यकांनी ठराविक रकम देवून त्यांची सोय करून देण्यात आयोजकांचा सहभाग असतो.मग मिळालेल्या शासकीय निधीच काय?असाही प्रश्न पडतो.अवाजवी खर्च न करता वर्षभरात कुठेना कुठे होणाऱ्या छोट्या छोट्या साहित्य संमेलनाला त्या शासकीय निधीचा उपयोग केला तर साहित्य संमेलनाची चळवळ अखंडपणे सुरू राहील अनेक कवि साहित्यिक तयार होतील व मराठी भाषा मागे न पडता आपली मराठी भाषा कायम अग्रस्थानी असेल.खरतर साहित्य संमेलनामुळेच मराठी भाषा अनेकांपर्यंत पोहचते पण आज साहित्यातील भाषा हरवल्या सारखी वाटते,साहित्या विषयीची रसिकता नाहीशी झालेली वाटते. मोबाईल सारखे करमणुकीचे अनेक साधन उपलब्ध झाल्याने रसिकांची रसिकता,कृतिशीलता,
वैचारिक सहभाग अत्यंत कमी होतोय.वेगवेगळ्या वाहिन्यांवर धुमाकूळ घालणाऱ्य माणसीकता व कुटुंब व्यवस्थेला खराब करणाऱ्या मालिकांमुळे दर तासाला माणूस बदलताना दिसतोय.तरूण हिंसक होताना दिसत असून तरुणींच्या मानगुटीवर फॅशनच भुत बसलेल दिसुन येतं.आता अस्सल मराठमोळा पेहरावा सहजासहजी कोणी घालत नाही.व कमी प्रमाणात बघायला मिळतो.म्हणून भाषा,संस्कृती,साहित्य जिवंत ठेवायचे असेल निःपक्षपाती साहित्य संमेलन झाली पाहिजे.साहित्य चळवळ अखंडपणे सुरू असली पाहिजे.साहित्य चळवळ ही साहित्यिक विचारांची प्रक्रिया आहे.आपल्या समाजातील,
सहवासातील,सर्व स्थरातील जाणकार साहित्यकांनी एकत्र येवून साहित्य जपण्यासाठी साहित्य चळवळीत सहभागी असने गरजेचे आहे.
आज जी संमेलन होतात तिथे फक्त नामवंत प्रस्थापित साहित्यकांचाच वावर असतो किबहुना त्यांनाच मानाचे स्थान असते,पण जे नवोदित आहे किंवा जे नावारूपाला येत आहे अशा साहित्यिकांच काय त्यांना तर व्यासपीठाच्या खालीच बसावे लागते.म्हणून साहित्याची आवड असणारे,साहित्य जोपासणारे,साहित्यावर प्रेम करून सातत्याने लिखाण करणारे आशा सर्वांना एकत्र करून शिबिराच्या रूपाने नवे ज्ञान,नवे विचार,नवे विषय,नवे प्रश्न,यावर चर्चा झाली पाहिजे.हल्ली सामाजीक प्रश्न गरजेचा असून समाजाला जागृत करण्यासाठी साहित्य चळवळ उपयुक्त ठरणार आहे.साहित्याचे वैशिष्ट्य जपण्याचे कार्य चळवळीतून लक्षात आणून देता येते.साहित्य माणूस घडवण्याची कार्यशाळा आहे आणि अशा कार्यशाळा साहित्य चळवळीच्या माध्यमातूनच सुरू व्हायला हवीत

*संजय धनगव्हाळ*
९४२२८९२६१८

प्रतिक्रिया व्यक्त करा

four − 1 =