You are currently viewing अकाली वृद्धत्व

अकाली वृद्धत्व

*भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र, उपाध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे लिखित लेख*

 

*अकाली वृद्धत्व*

 

माणसाच्या जीवनातील महत्वाचे तीन टप्पे आहेत ते म्हंजे बालपण तरुणपण. आणि सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे म्हातारपण. असा आपला जीवनक्रम सुरू असतो. लहानपण खेळात जाते. तरुणपणी आपल्या सवयी. आपले संस्कार. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या परिस्थितीची ओळख असायलाच हवी. आणि आपणं आपल्या तारूण्यात आपल्या आई वडील यांचे बोलणें आपणांस चांगल्या वाईट गोष्टी सांगणे ओझं वाटायला लागतं. आणि यामुळेच आपल्या तारुण्याचे कोळसे झालेले आपण बघतो. शेवटी म्हातारपण येत ते कधीही कुणालाही चुकणार नाही. आपण आपल्या तरुण वयात केलेल्या कामाचा मिळविलेल्या संपत्तीचा काही भाग आपल्या म्हातारपणात आपल्याला आधार म्हणून बाजूला काढणे हा निसर्ग नियम आहे. अस जर आपणं केलं नाही तर आपल्याला आपली मुलं सांभाळणार नाहीत. आपल्याला औषध मिळणारं नाही. आपल्याला वृध्दाश्रमाचा आधार घ्यावा लागेल. नाहीतर रस्त्यावर भिक मागावी लागेल हे खरोखरच परम सत्य आहे.

वृद्धत्व वयाने येते हे जरी खरं असलं तरी काही आपल्या वाईट सवयी. आहार. संस्कार. आपल्याला असणारा कामाचा नोकरी बेरोजगारी याचा तणाव. आपणांस अकाली वृद्धत्व येण्यास कारणीभूत आहेत. तोंडावर खुश असणारे वरवरचं खुश असतात. आतलयात मनांत झुरतात त्यामुळे अकाली वृद्धत्व येते.

शैक्षणिक आडमुठ्या धोरणामुळे आणि शिक्षण पूर्ण करण्याचा कालावधी घराची परिस्थिती. आर्थिक ओढ. आज मुलांना आज कमीत कमी 30/35 वया पर्यंत शिक्षण घ्यावं लागतं आणि त्यांनंतर नोकरी. काम शोधण्यासाठी जाणारा वेळ यामुळे मुलांचे लग्नाचे वय निघून जातं आहे. आणि त्यामुळे आज मुल मुली. मनातून खचून गेले आहेत. लग्नाची अपेक्षा सोडून देणं हे मनातून खचणे हे सुद्धा अकाली वृद्धत्व येण्याचे महत्वाचे कारण आहे. शारीरिक सुख: पूर्वीच्या काळी बालविवाहाची प्रथा होती, त्यानंतर लग्नाचे वय १८ करण्यात आले. मात्र आता करिअर, शिक्षण यामुळे ३०-३५ वय उलटले तरी लग्न होतातच असे नाही. लग्नाचे वय निघून गेले की लग्नच करू नये हा विचार बळावतो आणि एकाकी आयुष्य जगत अकाली वृद्धत्व येते. म्हणून आचार्य चाणक्य म्हणतात की अन्नाची भूक जेवढी महत्त्वाची तेवढीच शारीरिक भूकदेखील महत्त्वाची आहे आणि ती नैसर्गिक आहे. योग्य वयात ती शमली नाही, तर स्त्री पुरुष अनैतिक मार्ग अवलंबू शकतात. आणि ते सुख मिळाले नाही तर कदाचित आक्रस्ताळेपणा वाढू शकतो किंवा नैराश्याने मनुष्य खचून जाऊ शकतो. म्हणून लग्न वेळेत करून या सुखाची पूर्ती केली असता वासनेवर नियंत्रण राहते आणि परमार्थाकडे जीवन वळवता येते.

प्रवास हा आपल्याला मित्र सगेसोयरे. आपले प्रिय व्यक्ती. यांच्यासोबत प्रवास केल्याने आपले मन प्रफुल्लित होतें आणि आपल्या मनाचा थकवा दूर होतो. यामुळे आपणांस जगण्याचा आनंद येतो. आपले जगणे लोकांसाठी आपल्या घरच्या लोकांसाठी गरजेचे आहे ही भावना आपल्या मनांत येते आणि आचार्य चाणक्य सांगतात, जे लोक प्रवास करत नाहीत ते लवकर वृद्ध होतात, याउलट जे लोक खूप प्रवास करतात, निसर्गात रमतात, अनेक लोक जोडतात, ते लोक कायम उत्साही आणि सकारात्मक राहतात. त्यामुळे त्यांचा मेंदू सतेज राहतो आणि अकाली वृद्धत्व येत नाही. घरात बसून, चाकोरीबद्ध आयुष्य जगून वृद्धत्व लवकर येते आणि जीवन बेचव भासू लागते. म्हणून उमेद कायम ठेवा, शरीर थकेपर्यँत भरपूर प्रवास करा आणि आनंदी जीवन जगा. यामुळे आपणांस अकाली वृद्धत्व येणारं नाही.

बंधन मोह . आशा. यामध्ये आज प्रत्येक जण अडकला आहे. आई. वडील. बहिण. भाऊ. विविध नात्यातील लोक. पती पत्नी. अशा विविध आज प्रत्येक जण अडकले आहेत. आपल्याला कोणी धोका दिला. आपल विश्वास तुटला. कोणतीही गोष्ट नात्यातील लोकानी आपल्या मनाविरुद्ध केली. अशा  बंधनात अडकलेले लोक कुढत आयुष्य काढतात. ते बंधन कोणी लादलेले असू शकते किंवा परिस्थितीने स्वीकारलेले असू शकते. बंधनाच्या ओझ्याखाली मनुष्य झुकतो आणि कणाहीन होतो. याचा अर्थ जबाबदाऱ्या अंगावर घ्यायच्याच नाहीत असे नाही, तर त्या बंधनातून स्वतःसाठी पूरक वेळ काढावा आणि आपल्या स्वप्नांना पंख द्यावेत. अन्यथा वय उलटून जाते आणि जबाबदाऱ्या संपत नाहीत अशी स्थिती निर्माण होते. तरुण वयातच पोक्त विचारांनी व्यक्तीच्या वागण्या बोलण्यात वृद्धत्व डोकावू लागते आणि माणूस एकाकी पडतो. आणि अकाली वृद्धत्व येते आणि आयुष्य कमी होते.

सर्व नियतीची कारणं आहे ते म्हणजे मनावर अवलंबून असतें पण आज लोक आपला चेहरा सुंदर करण्यासाठी विविध बाजारांत उपलब्ध असणारी विविध केमिकल सौंदर्य प्रसाधने वापरतात आणि मनातून दुःखी असतात त्यांच्या सौंदर्याचा कांहीच उपयोग नाही तरूण दिसण्यासाठी लोक विविध उपाय करतात, सर्वांनाच नितळ व चमकदार त्वचा हवी आहे, तरुण दिसण्यासाठी काही जण खास ट्रिटमेंटदेखील घेतात. याशिवाय आपल्या आहारातदेखील अमुलाग्र बदल करतात. परंतु एवढं केल्यावरही पदरी निराशा पडते. याचे खरे कारण तुमच्या काही चुकीच्या सवयींमध्ये दडले आहे. आपल्या सवयी नाही बदलल्या तर अकाली वृद्धत्व येणार हे तेवढंच खरं आहे.

वाढत्या वयातही आपले तारुण्य खुलून दिसावे, आपल्या चेहरा तजेलदार व नितळ असावा, असे प्रत्येकाला वाटणे स्वाभाविक आहे. प्रत्येकाला कायम तरुण राहायचे असते. दीर्घकाळ तरुण दिसण्यासाठी विशेषत: महिलांमध्ये खूप चढाओढ असते. यासाठी ते अगदी महागडे उपचार तसेच प्रोडक्टदेखील वापरतात. परंतु आरोग्य तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक व्यक्तीला काही वाईट सवयी असतात ज्यामुळे शरीराला हानी पोहोचते. या सवयी केवळ आपल्या आरोग्यासाठीच हानिकारक नसतात तर अकाली वृद्धत्वालादेखील आमंत्रित करीत असतात. अशा स्थितीत तुम्ही तरुण वयातच म्हातारे दिसू लागतात, खालील चुकीच्या सवयी तुम्हालाही असतील तर वेळीच त्या बदला. आणि सुखी आनंदी जीवन जगा.

तणाव आज प्रत्येकजण काही ना काही तणावात आहे. कुणाला पैसा. सत्ता. सौंदर्य. बेरोजगारी. महागाई. समाजात दुजा भाव. मानसिक शारीरिक तणाव. अशा विविध तणावात आज गोरगरीब. सर्वसामान्य लोक अडकली आहेत.

कोणत्याही गोष्टीबद्दल जास्त चिंता केल्याने लोक लवकर वृद्ध दिसू लागतात. अशी लोकं कोणत्या ना कोणत्या मानसिक किंवा शारीरिक आजाराला बळी पडू शकतात. अनेकदा ही प्रक्रिया आपल्या लक्षात येत नाही, पण तणाव हा एक अतिशय घातक आणि सायलेंट किलर ठरू शकतो. त्यामुळे दीर्घकाळ तरूण राहायचे असेल तर ताण घेणे टाळले पाहिजे. चिता मयत व्यक्तीला जाळते आणि चिंता जिवंत व्यक्तिला जाळते म्हंजे तणाव घेणं नाही नाहीतर अकाली वृद्धत्व येते.

पुरेशी झोप न घेणे

दररोज 7 ते 8 तास झोप न घेतल्यानेही अकाली वृध्दत्वाची समस्या निर्माण होउ शकते. पुरेशी झोप न लागण्याचा तणावाशी संबंध आहे. झोप आपल्याला तरुण राहण्यास आणि तणावमुक्त ठेवण्यास मदत करते आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते. पण काही लोक ते गांभीर्याने घेत नाहीत. तरुणांमध्ये ही समस्या वेगाने वाढत आहे.

शारीरिक हालचाली न होणे

शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसल्यामुळे आपण अनेक आजारांना बळी पडू शकतो. व्यायाम न करणे किंवा दैनंदिन जीवनशैलीत शरीर पुरेसे सक्रिय न ठेवणे याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. अशा स्थितीत शरीराला लवकर आजार लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपले तारुण्य कमी होते.

योग्य आहार न घेणे आज आपलीं जीभ चाटकी झाली आहे. बाजारात केमिकल. मिश्रित खाद्य अन्न आपणं खातो. वडा पाव. मिसळपाव. इडली. बेकरी उत्पादने. तेलात भेसळ. दुधात भेसळ. अशा विविध भेसळयुक्त पदार्थ आज रोज आपल्या खाण्यात येतात त्यामुळे

अकाली वृद्धत्वासाठी सकस आहार न घेणे हेदेखील मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. 21 व्या शतकात सोडा, प्रक्रिया केलेले अन्न आणि फॅटी फूड यासारख्या गोष्टी आपल्या आहाराचा एक मोठा भाग बनल्या आहेत. या गोष्टी आपल्या आयुर्मानात घट होण्यास जबाबदार आहेत. त्यामुळे सकस आहार घेणे शरीरासाठी व तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी आवश्‍यक आहे.

धूम्रपान आणि मद्यपान तरुण पिढी आज तंबाखू. गुटखा. अफू. चरस. गांजा. नशेच्या गोळ्या. विविध सुगंधी तंबाखू. सिगरेट. दारु. अशा विविध व्यसनात अडकत आहे तणाव टाळण्यासाठी बरेच लोक दारू, तंबाखू किंवा मादक पदार्थांचे सेवन करू लागतात. यामुळे या सवयींकडे तरुण पिढी अधिक आकर्षित होत आहे. त्यांच्या अतिसेवनाने एखाद्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो, परंतु त्याआधीच त्याचे सतत आणि जास्त सेवन आपल्याला वृद्धत्वाकडे वेगाने घेउन जात असते.

मानवांमध्ये, वृद्धत्व हे मानवामध्ये कालांतराने होणाऱ्या बदलांचे प्रतिनिधित्व करते आणि त्यात शारीरिक, मानसिक आणि सामाजिक बदलांचा समावेश असू शकतो. प्रतिक्रियेची वेळ, उदाहरणार्थ, वयानुसार मंद होऊ शकते, तर आठवणी आणि सामान्य ज्ञान सामान्यतः वाढते. वृद्धत्वामुळे कर्करोग , अल्झायमर रोग , मधुमेह , हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग , स्ट्रोक आणि बरेच काही यासारख्या मानवी रोगांचा धोका वाढतो . जगभरात दररोज मरणार्‍या अंदाजे १,५०,००० लोकांपैकी सुमारे दोन तृतीयांश लोक वयाशी संबंधित कारणांमुळे मरतात.

वर्तमान वृद्धत्वाचे सिद्धांत नुकसान संकल्पनेला नियुक्त केले जातात, ज्यायोगे नुकसान जमा होण्यामुळे (जसे की डीएनए ऑक्सिडेशन ) जैविक प्रणाली अयशस्वी होऊ शकते किंवा प्रोग्राम केलेल्या वृद्धत्वाच्या संकल्पनेला, ज्यायोगे अंतर्गत प्रक्रिया (एपिजेनेटिक देखभाल जसे की डीएनए मेथिलेशन ) जन्मतःच वृद्धत्व होऊ शकते. प्रोग्राम केलेले वृद्धत्व हे प्रोग्राम्ड सेल मृत्यू ( अपोप्टोसिस ) सह गोंधळून जाऊ नये .

लठ्ठपणा वृद्धत्वाला गती देण्यासाठी प्रस्तावित केले गेले आहे, तर प्राइमेट नसलेल्या प्राण्यांमध्ये आहारातील कॅलरी निर्बंध चांगले आरोग्य आणि शरीराची कार्ये राखून वृद्धत्व कमी करते. प्राइमेट्समध्ये (मानवांसह), असे जीवन-विस्तारित परिणाम अनिश्चित राहतात.

संस्कृती वेगवेगळ्या प्रकारे वय व्यक्त करतात. प्रौढ व्यक्तीचे वय सामान्यतः जन्माच्या दिवसापासून संपूर्ण वर्षांमध्ये मोजले जाते. (सर्वात उल्लेखनीय अपवाद – पूर्व आशियाई वयाची गणना – विशेषत: अधिकृत संदर्भांमध्ये कमी सामान्य होत आहे.) जीवनाचा कालावधी चिन्हांकित करण्यासाठी निर्धारित केलेल्या अनियंत्रित विभाजनांमध्ये किशोर ( बालपणापासून बालपणापासून , किशोरावस्थेपासून आणि पौगंडावस्थेपर्यंत ), लवकर प्रौढत्व , मध्यम प्रौढत्व यांचा समावेश असू शकतो. ,* आणि उशीरा प्रौढत्व .* अनौपचारिक अटींमध्ये समाविष्ट आहे”, “किशोर”, *”ट्वेंटीसमथिंग”, “थर्टीसमथिंग”, इ. तसेच “डेनेरियन”, *”व्हाइसनेरियन”, “ट्रायसेनेरियन”, *”चतुर्भुज”, इ.

बहुतेक कायदेविषयक प्रणाली एखाद्या व्यक्तीला विशिष्ट क्रियाकलाप करण्याची परवानगी किंवा बंधनकारक असताना विशिष्ट वय परिभाषित करते. या वयाच्या वैशिष्ट्यांमध्ये मतदानाचे वय , पिण्याचे वय , संमतीचे वय , बहुसंख्य वय , गुन्हेगारी जबाबदारीचे वय , विवाहयोग्य वय , उमेदवारीचे वय आणि अनिवार्य सेवानिवृत्तीचे वय यांचा समावेश होतो . मोशन पिक्चर रेटिंग सिस्टमनुसार एखाद्या चित्रपटासाठी प्रवेश, वयावर अवलंबून असू शकतो . तरुण किंवा वृद्धांसाठी बसच्या भाड्यात सवलत दिली जाऊ शकते. प्रत्येक राष्ट्र, सरकारी आणि गैर-सरकारी संस्थेचे वय वर्गीकरण करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. दुसऱ्या शब्दांत, कालक्रमानुसारवृद्धत्व हे “सामाजिक वृद्धत्व” (सांस्कृतिक वय-लोकांनी वाढत्या वयात कसे वागावे याच्या अपेक्षा) आणि “जैविक वृद्धत्व” (जशी वयानुसार एखाद्या जीवाची शारीरिक स्थिती) पासून वेगळे केले जाऊ शकते. एक अभ्यासानुसार वयवादामुळे एका वर्षात युनायटेड स्टेट्सला $63 अब्ज खर्च झाला . [११४] 21व्या शतकातील वृद्धत्वाबद्दल UNFPA च्या अहवालात, “वृद्धत्वाच

21 व्या शतकात, लोकसंख्येतील सर्वात लक्षणीय कल म्हणजे वृद्धत्व. सध्या, जगाच्या सध्याच्या लोकसंख्येच्या ११% पेक्षा जास्त लोक ६० वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे लोक आहेत आणि युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNFPA) च्या अंदाजानुसार 2050 पर्यंत ही संख्या अंदाजे 22% पर्यंत वाढेल. विकासामुळे वृद्धत्व आले आहे ज्यामुळे चांगले पोषण, स्वच्छता, आरोग्य सेवा, शिक्षण आणि आर्थिक कल्याण शक्य झाले आहे. परिणामी, प्रजनन दर कमी होत चालले आहेत आणि आयुर्मान वाढले आहे. 33 देशांमध्ये जन्माच्या वेळी आयुर्मान 80 पेक्षा जास्त आहे. वृद्धत्व ही एक “जागतिक घटना” आहे, जी मोठ्या तरुण लोकसंख्येसह विकसनशील देशांमध्ये सर्वात वेगाने घडत आहे आणि “व्यक्ती, कुटुंबे आणि समाजांना सुसज्ज करण्यासाठी धोरणांच्या योग्य संचाने” मात करता येऊ शकणार्‍या कार्यासाठी सामाजिक आणि आर्थिक आव्हाने उभी करतात. या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि त्याचे फायदे मिळवण्यासाठी.

विकसित देशांमध्ये आयुर्मान वाढते आणि जन्मदर घटतो, त्यानुसार सरासरी वय वाढते. युनायटेड नेशन्सच्या मते , ही प्रक्रिया जगातील जवळजवळ प्रत्येक देशात होत आहे. वाढत्या मध्यम वयाचे महत्त्वपूर्ण सामाजिक आणि आर्थिक परिणाम होऊ शकतात, कारण कर्मचारी संख्या उत्तरोत्तर वृद्ध होत जाते आणि वृद्ध कामगार आणि सेवानिवृत्तांची संख्या तरुण कामगारांच्या संख्येच्या तुलनेत वाढते. वृद्ध लोक सामान्यतः कामाच्या ठिकाणी तरुण लोकांपेक्षा अधिक आरोग्य-संबंधित खर्च करतात आणि कामगारांच्या भरपाई आणि पेन्शन दायित्वांमध्ये देखील जास्त खर्च होऊ शकतात. बर्‍याच विकसित देशांमध्ये जुने कर्मचारी काहीसे अपरिहार्य आहेत. उदाहरणार्थ, युनायटेड स्टेट्स मध्येब्यूरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्सचा अंदाज आहे की 2020 पर्यंत चारपैकी अकाली वृद्धत्व या सापळ्यात अडकलया शिवाय राहणार नाही.

पुरुष हा मानसिकदृष्ट्या कणखर असावा, त्याने कधी रडू नये, असे अलिखित नियम समाजाने घालून दिलेले असतात. मात्र पुरुषांचं मानसिक आरोग्य हा एक मोठा विषय आहे.  ताणतणाव हे स्त्री पुरुष दोघांनाही असतात. फक्त कारणं थोडीफार वेगळी असतात. पैसा कमावणं हे पुरुषांच्या ताणतणावाचं सगळ्यात मुख्य कारण असल्याचं डॉ.पालकर यांचं मत आहे. पैसा किती मिळतो यावर पुरुषांची  किंमत ठरते. याचा मोठा ताण पुरुषांवर असतो. पैसे कमावणं हे पुरुषांचंच काम आहे हे समाजाने बिंबवलं तरी आता हे चित्र हळूहळू बदलत आहे. यासाठी पालकांशी, जोडीदाराशी योग्य संवाद असावा असं ते सुचवतात.

स्त्रियांना मानसिक आरोग्याच्या समस्या आढळल्या तर त्या बोलून मोकळ्या होतात तर कधी रडून मोकळ्या होतात. पुरुषांचं तसं होत नाही. आपल्या मानसिक समस्यांमबद्दल पुरुषांमध्ये जागरुकता असली तरी ते मोकळणेपणाने बोलत नाही .

स्त्रिया आता पुरुषांच्या बरोबरीने घराबाहेरची कामं करतात. त्याचप्रमाणे पुरुषांनीही घरातली कामं शिकायला हवी असंही  पुरुषांनी त्यांच्या भावना अधिक मोकळेपणाने मांडल्या तर त्यांचा योग्य प्रकारे निचरा होईल, ताणतणाव कमी होतील आणि ते कमी करण्यासाठी इतर उपायांचा आधार घ्यावा लागणार नाही

पुरुष कायमच लंपट, लाळघोटे असतात असं सरसकट लेबल लावलं जातं. त्यामुळे पुरुषांना त्यांच्या मैत्रिणीशी, स्त्री सहकाऱ्यांशी बोलणं कठीण होऊन बसतं असं मानसोपचार तज्ज्ञ अक्षता भट यांचं मत आहे.

आपल्या शरीराचा योग्य स्वीकार न करणं हेही पुरुषांमध्ये आढळून येणारी एक समस्या आहे. अती लठ्ठ किंवा अती बारीक असेल तर त्यांना हिणवलं जातं. या समस्येला असं म्हणतात. त्यामुळे स्टिरॉईडचा वापर किंवा अती खाणं या गोष्टी वाढतात आणि वेगळ्या समस्या निर्माण होता.

लोकांचे वृद्धत्व ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जी सतत चालू असते. शरीरासोबतच आपले मनही वयानुसार वाढत जाते. काही लोकांचा मेंदू कमकुवत होतो. म्हणजेच वयाच्या आधी म्हातारा होतो. याची अनेक कारणे असू शकतात. मानसिक आरोग्याच्या समस्या, गंभीर आजार आणि विस्कळीत जीवनशैली यासारख्या घटकांमुळे मेंदूचे अकाली वृद्धत्व देखील होऊ शकते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हृदयाच्या खराब आरोग्यामुळे मेंदू अकाली ‘म्हातारा’ होऊ शकतो. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात ही बाब समोर आली आहे. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य आणि मेंदूच्या वृद्धत्वाची प्रक्रिया यांचा थेट संबंध असल्याचे आढळून आले आहे. हृदय निरोगी ठेवून तुम्ही मेंदू चांगला बनवू शकता.

अभ्यासाच्या संशोधकांचे म्हणणे आहे की हृदय किंवा रक्तवाहिन्यांसह संवहनी प्रणालीचे कोणतेही नुकसान, मेंदूला ऑक्सिजनयुक्त रक्त पुरवठ्यावर परिणाम करते. हा पुरवठा कमी झाल्यास आपल्या मेंदूच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. ऑक्सिजनयुक्त रक्त योग्य प्रमाणात न पोहोचण्याच्या स्थितीत, मेंदूतील अनेक रोगांचा धोका वाढतो. वयानुसार मेंदूचे वृद्धत्व सामान्य मानले जाते, परंतु तुमचे हृदयाचे आरोग्य खराब असल्यास, तुमचा मेंदू अकाली वृद्ध होईल. आतापर्यंत असे अनेक अभ्यास करण्यात आले आहेत. ज्यामध्ये हृदय आणि मेंदूच्या संबंधाबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत.

आंनदी जगा. स्वस्थ रहा. निरोगी रहा. व्यसनाधीनता पासून लांब रहा. आपले विचार दुसरयावर थोपू नका. आपले मत मांडा दुसर्याचे ऐका.

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा 2013 रक्षक समिती सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे 9890825859

प्रतिक्रिया व्यक्त करा