You are currently viewing जागतिक महिला दिनानिमित्ताने जागतिक “साकव्य” समूहासाठी विशेष महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सर्व महिलांचा सन्मान

जागतिक महिला दिनानिमित्ताने जागतिक “साकव्य” समूहासाठी विशेष महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सर्व महिलांचा सन्मान

*जागतिक महिला दिनानिमित्ताने जागतिक “साकव्य” समूहासाठी विशेष महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सर्व महिलांचा सन्मान*

जागतिक साहित्यिकाला व्यक्तित्व विकास मंच हा जागतिक पातळीवरील जवळपास १५०० सदस्य असलेला साहित्यिक समूह. साकव्यच्या अनेक शाखा असून या शाखांमधून कित्येक महिला देखील साकव्यसाठी साहित्य सेवेचे महत्त्वपूर्ण असे योगदान देताना दिसून येत आहेत. अशा सर्व महिलांचा आम्हाला अभिमान आहे. आजच्या या जागतिक महिला दिनानिमित्त साकव्यकडून प्रातिनिधिक स्वरूपात साकव्यसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या काही महिलांचा सन्मान करण्यात येत आहे.
यात प्रामुख्याने तनुजा प्रधान उत्कृष्ट ॲडमिन, अरुणा मुल्हेरकर उत्कृष्ट संगीत मार्गदर्शिका, डॉ.स्नेहल कुलकर्णी उत्कृष्ट गजल गुरु, कल्पना गौरी उत्कृष्ट उपक्रम नियोजन, डॉ.नीलांबरी गानू उत्कृष्ट समन्वयक, अलका कुलकर्णी उत्कृष्ट कवयित्री, लेखिका, निवेदिका, अनुवादक, ऋचा कर्पे प्रसिद्धी माध्यमाचा सुयोग्य वापर, प्रा.सौ सुमती पवार उत्कृष्ट साहित्य निर्मितीतील सातत्य, डॉक्टर स्वाती घाटे उत्कृष्ट सामाजिक वैद्यकीय उद्बोदक कार्य… अशा कर्तृत्ववान सर्वच महिलांना साकव्यकडून मानाचा मुजरा…
साकव्यच्या कर्तृत्ववान महीलांपैकी एक म्हणजे *डॉ.स्वाती घाटे.*
बेबीलॉन्स न्यूटन इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड्स ॲडॉलसेंट डेव्हलपमेंट जयपूरच्या जॉईन डायरेक्टर असलेल्या डॉक्टर स्वाती घाटे या बाल व किशोर रोग मानसतज्ञ आहेत. बाल व किशोर यांच्या विकास व मानसिक स्वास्थ्य संबंधी समस्या व समुपदेशन करतात. या आपल्या व्यावसायिक जबाबदारी बरोबरच त्या साहित्य क्षेत्रातही उल्लेखनीय अशी कामगिरी करत आहेत. *”आठवण कोऱ्या पानांची”* हा त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध झालेला आहे. जयपुर मराठा मंडळाची सामाजिक कार्यकर्त्री व माजी सचिव आहेत. मराठी भाषा प्रचार व प्रसारासाठी नेहमीच प्रयत्न करत असतात. वैद्यकीय, सामाजिक, समाज प्रबोधन अध्ययन, अध्यापन, संशोधन, साहित्य, कलानिर्मिती, निर्देशक असे त्यांचे कार्यक्षेत्र आहे. दूरदर्शन, पत्रिका टीव्ही आदि मध्ये त्यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला आहे. बृहन महाराष्ट्र मंडळाच्या २०२२ सालचा विशेष कार्य गौरव पुरस्कार प्राप्त. इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक अँड ॲडोलसेंट हेल्थ अकादमी तर्फे २०२०, २०२१ विशेष सन्मान मिळाला आहे.
*अलका कुलकर्णी* एम ए बी एड व हिंदी पंडित असलेल्या अलका कुलकर्णी या उत्कृष्ट गद्य लेखन काव्य लेखन करतात त्याचबरोबर हिंदी मराठी मध्ये अनुवाद देखील करतात. साकव्यच्या त्या पदाधिकारी असून साहित्य सखी नाशिकच्या सचिव व नारायण सुर्वे कवी कट्टा साहित्य समूहाच्या समन्वयक देखील आहेत.
विश्वास रेडिओवर विशेष कार्यक्रमासाठी आरजे त्याचप्रमाणे अनेक कार्यक्रमांचे त्यांनी सूत्रसंचालन देखील केले आहे.
“गंध ओलेत्या मातीचा”, “नवे स्पंद” हे त्यांचे काव्यसंग्रह व “देव चाफ्यावरचं चांदणं” हा कथासंग्रह प्रसिद्ध झाला आहे.
“ओघळ छंद” हा ललित लेख संग्रह व “विचार पेरत जाऊ” लेख संग्रह प्रसिद्ध आहेत.
जागतिक कला वर्तुळ साहित्य अकादमी पुणेचा गीतरत्न पुरस्कार, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा इंद्रायणी पुरस्कार, नाशिक कवी राज्यस्तरीय काव्य लेखन पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद उरळी कांचन चा साहित्य लेखन पुरस्कार, एकता कल्चरल अकादमी पुणे काव्य लेखन पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.
*डॉ.स्नेहल विजय कुलकर्णी*
ग्रामीण रुग्णालय गारगोटी येथे जवळपास बारा वर्षे सेवा त्याचबरोबर गारगोटी येथे खाजगी वैद्यकीय व्यवसाय करतात.
“ती” ची कविता” हा काव्यसंग्रह, “स्नेहांकित” गझल संग्रह, व “स्नेहांकुर” हा वृत्तबद्ध कविता संग्रह प्रकाशित.
राज्यस्तरीय गजल रंग पुरस्कार, राज्यस्तरीय वैद्यकीय व साहित्य सेवा पुरस्कार, उत्कृष्ट वैद्यकीय अधिकारी पुरस्कार, स्नेहांकित गझल संग्रहालय तब्बल सात राज्यस्तरीय पुरस्कार, असे अनेक राज्यस्तरीय व साहित्य क्षेत्रातील नामवंत असे पुरस्कार डॉ.स्नेहल कुलकर्णी यांना प्राप्त झाले आहेत.
कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावरून सातत्याने त्या गझल कविता लघुलेख लघुकथा आदि प्रसारित करतात.
आणि गझल मुशायरे कवी संमेलनात त्यांचा आवर्जून समावेश असतो.
भारतीय स्त्रियांचे आरोग्य किशोरवयीन मुलींच्या समस्या आदींवर त्यांनी डोंगर भागातून ५०० पेक्षाही जास्त व्याख्याने दिली आहेत. करुणा काळामध्ये देखील त्यांची कामगिरी उल्लेखनीय अशीच होती.
एचआयव्ही बाबत, क्षयरोग, कुष्ठरोग, एड्स इत्यादींवर जनजागृतीपर व्याख्याने दिली.
*डॉ. नीलांबरी गानू*
राजगुरुनगर पुणे येथील रहिवासी असलेल्या डॉ.नीलांबरी गाणी यांना तीन देशांमधून डॉक्टरेट प्राप्त झाली असून २०१२ पासूनचा त्यांचा साहित्य प्रवास सुरू झालेला आहे.
अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर त्यांनी विपुल असे कादंबरी लेखन केले आहे.
शिवयोगीनी, गंगाजल निर्मळ, अहिल्याबाईंची बखर, शिवयोगिनी इंग्रजी अनुवाद संत गाडगेबाबा यांच्यावर ललित ढंगांची अव्वल संत कादंबरी, स्त्री शक्ती स्त्री मुक्ती यावर आधारलेली सामाजिक कादंबरी, बंदिस्त, यशवंत होळकर यांची तृतीय पत्नी तुळसाबाई होळकर यांच्यावरील कादंबरी, अशा जवळपास सात ते आठ कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या असून कोपरखळ्या या कादंबरीचे लेखन सुरू आहे.
जवळपास दीडशे पेक्षा जास्त लेख त्यांनी लिहिलेले असून तुळसाबाई होळकर यशवंतराव होळकर यांच्यावरही वेगवेगळे लेख लेखन केले आहे.
125 मराठी कथा व चार हिंदी कथा लिहून पूर्ण आहेत.
अहिल्याबाई होळकर यांच्यावरील अडीच तासाचे दोन अंकी नाटक चार प्रहसने, भारुड, भलरी पटनाट्य त्यांनी लिहिली आहेत.
अहिल्या नाट्य मंडळ इंदोर मध्य प्रदेश यांच्याकडून त्यांना रोख 11000 रुपये व सन्मानचिन्ह प्रदानित करण्यात आले.
“निलांबर” हा मराठी कविता संग्रह तर “इबादत” हिंदी कविता संग्रह प्रकाशित झाला आहे.
धार्मिक…मुक्त आनंदघन यांच्या धार्मिक दिवाळी अंकाच्या त्या उपसंपादिका असून त्यांनी हिंदी गुजराती व मराठी मध्ये विपुल असे साहित्य लेखन केलेले आहे.
*कल्पना गवरे*
बीएससी बीएड एम ए (एज्यु.) डीएसएम, योगाटीचर असून डोंबिवलीच्या नेरुरकर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या माजी प्रिन्सिपल व सीसीआरटी च्या सदस्या आहेत.
कल्पना गवरे या उत्कृष्ट अशा लेखिका, पपेटीयर आहेत.
“आणि राघू बोलू लागला” ही नाटिका त्यांनी दूरदर्शनवर सादर केली आहे.
विविध पटनाट्य, नाटिका यांचे लेखन व सादरीकरण केले आहे.
त्यांनी शैक्षणिक व विविध संस्थांमध्ये कथाकथनाचे कार्यक्रम, पर्यावरण संरक्षण, भारतीय संस्कृती व इतिहास, विज्ञान संबंधी विषयावर स्लाईड शो त्याचबरोबर छायाचित्रांचे प्रदर्शनही त्यांनी आयोजित केले होते.
रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीचा आदर्श शिक्षक, रुस्तम इराणी फाउंडेशन, कलासागर, करूया, इत्यादी सामाजिक संस्थांचे पुरस्कार प्राप्त आहेत.
*प्रा.सौ.सुमती पवार*
नाशिक येथील सुप्रसिद्ध साहित्यिका प्राध्यापिकासहसुमती पवार यांनी मराठी आणि अहिराणी बोलीतून विपुल असे साहित्य लिहिले आहे. त्यांच्या कविता शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकातही अभ्यासात घेतल्या गेल्या आहेत.
प्रा.सौ. सुमती पवार या कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापिका म्हणून निवृत्त झालेल्या असून आतापर्यंत त्यांची २२ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत त्याचबरोबर येत्या काही दिवसात आणखी ४ पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.
प्रा. सुमती पवार यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले असून २०२२ सालचा देशातील नावाजलेला असा संत नामदेव बाल साहित्य पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे.
दिनक्रम असल्याप्रमाणे प्रा.सौ. सुमती पवार या रोज एक दोन कविता तरी लिहीत असतात.
*अरुणा मुल्हेरकर*
लेखिका कवयित्री म्हणून सर्वांनाच ज्ञात असलेल्या अरुणाताई या एक उत्कृष्ट संगीत विशारद म्हणूनही ओळखल्या जातात मराठीतून विपुल असे लेखन करणाऱ्या अरुणाताई आपल्या सुमधुर आवाजात उत्तम गायन करतात. नवोदितांना सरस मार्गदर्शन देखील करतात.
*तनुजा प्रधान*
अमेरिकेसारख्या सर्व सुखसुविधा असलेल्या देशात वास्तव्यास असणाऱ्या तनुजा प्रधान या देखील मराठीतील एक नामवंत लेखिका, कवयित्री म्हणून ओळखल्या जातात. साकव्य परदेशी साहित्य समूहाच्या ॲडमीन म्हणून त्यांनी उत्तम रित्या काम पाहिले आहे. भावसृजन या ब्लॉग मधून अनेक विषयांवर त्यांचे लेखन वाचनात येते.
*ऋचा कर्पे*
सर्वांच्या परिचयाचे असलेले नाव म्हणजे ऋचा कर्पे. लेख काव्य आधी साहित्य लेखनाबरोबरच अनेक जुन्या नव्या लेखकांना एक व्यासपीठ मिळवून देण्याचे त्याचबरोबर जुन्या नव्या लेखकांच्या साहित्याला प्रसिद्धी देण्याचे उत्तम कार्य ऋचा कर्पे करत आहेत. “शोपिझन” वर अनेक कवी, कवयित्री, लेखकांची पुस्तके त्यांनी प्रकाशित केली आहेत.

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या आणि अशा सर्व कर्तृत्ववान महिलांना मानाचा मुजरा करीत आहे…*

*लेखन:- दीपक पटेकर (दीपी)*
सावंतवाडी

*प्रॉपर्टी विकणे आहे*

*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*

*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*

*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*

*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*

*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*

*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈

*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*

*👉पारदर्शक व्यवहार*🔍

#######################
*Advt link …👇*

*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*

*▪️घर धरून 03 गुंठे जागा*

*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*

*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*

*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*

*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*

*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा