You are currently viewing गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थीनींची राज्यस्तरीय हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी निवड

गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थीनींची राज्यस्तरीय हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी निवड

इचलकरंजी येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थीनी श्रावणी रवंदे व समीक्षा मिठारी यांची नागपूर राज्यस्तरीय हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी निवड करण्यात आली आहे.

श्रावणी रवंदे व समीक्षा मिठारी या दोन्ही विद्यार्थीनी
सध्या श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत.त्यांची नागपूर येथे होणा-या
१४ वर्षाखालील गटात हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धा अंतर्गत निवड चाचणीसाठी निवड झाली आहे.
पालकांचे प्रोत्साहन व शाळेचे पाठबळ यामुळे त्यांना हे यश संपादन करणे शक्य झाले. या यशाबद्दल त्यांचे ना. बा. एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा , चेअरमन हरीश बोहरा, व्हाईस चेअरमन उदय लोखंडे ट्रेझझर राजगोपाल डाळ्या, सेक्रेटरी बाबासाहेब वडींगे , स्कूल कमिटी चेअरमन मारुतराव निर्माणकर या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.तसेच संस्थेमार्फत त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील खेळासाठी शुभेच्छा दिल्या. यासाठी त्यांना क्रीडा विभाग प्रमुख शेखर शहा व एस. के. लाड यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा