You are currently viewing सावंतवाडीत २८ तारखेला स्वामी समर्थ पादुका दर्शन सोहळा…

सावंतवाडीत २८ तारखेला स्वामी समर्थ पादुका दर्शन सोहळा…

सावंतवाडी

अक्कलकोट अन्नछत्र मंडळ यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे दर्शन सोहळा बुधवार ता. २८ ला सावंतवाडी-भटवाडी येथील श्री देव ब्राह्मण देवालय गोविंद चित्र मंदिरनजिक आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सकाळपासून धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजल्यापासून पादुका दर्शन सोहळा होणार आहे. रात्री ८ वाजता भाई शिर्के महापुरुष गोठण यांचे दशावतारी नाटक होणार आहे. तर २९ तारखेला सकाळी अभिषेक व पूजा होणार आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ब्राह्मण देवालय परिसर मित्र मंडळ व कुणाल श्रृंगारे मित्र मंडळाकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा