You are currently viewing किसान चौक – चंदुर हद्द रस्त्याचे डांबरीकरण करा!

किसान चौक – चंदुर हद्द रस्त्याचे डांबरीकरण करा!

आम्ही उद्योजक संघटनेची प्रशासकांकडे निवेदनाव्दारे मागणी

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी येथील किसान चौक ते चंदुर हद्द या दरम्यानचा
रस्ता अत्यंत खराब झाला आहे. त्यामुळे हा रस्ता अपघातामुळे वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. त्यामुळे या रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण करावे, अशी मागणी आम्ही उद्योजक संघटनेच्यावतीने नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.
प्रदीप ठेंगल यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी सदर रस्त्याचे डांबरीकरण तातडीने करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी ठेंगल यांनी शिष्टमंडळाला दिले.

इचलकरंजी शहरातील किसान चौक, सुर्वेनगर ते चंदूर रोडवरील कित्तुरे घरापर्यंतचा नगरपरिषद हद्दीतील रस्ता अत्यंत खराब झाला आहे. परिणामी, सदर रस्ता वाहतुकीसाठी खूप धोकादायक बनला आहे. रस्त्यावर अनेक मोठे खड्डे पडल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. आभार फाटा भागामध्ये अनेक छोटे-मोठे कारखाने असल्याने दररोज कामगार व उद्योजकांची या रस्त्याला खूप वर्दळ असते. याशिवाय शाहू हायस्कुलसह अनेक प्राथमिक शाळेमध्येही शाहूनगर चंदुर, सहारानगर भागातून अनेक विद्यार्थी दररोज सायकलीने किंवा चालत प्रवास करत असतात. अगामी पावसाळ्यात पाणी साठत किंवा गटारीचे पाणी तुंबून रस्त्यावर येवून शाळकरी विद्यार्थ्याना तसेच नागरीकांना त्रास होण्याची दाट शक्यता आहे. तरी येत्या पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी
मागणी आम्ही उद्योजक संघटनेच्यावतीने नगरपरिषदेचे
प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.प्रदीप ठेंगल यांच्याकडे
निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
यावेळी राजू नदाफ, उमेश लाड, मोहन ढवळे, विशाल ढवळे, दीपक जाधव, अरुण म्हेत्रे, प्रशांत नेजे, राहुल मांडवकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा