You are currently viewing सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग व महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन..

सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग व महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन..

सावंतवाडी

कोरोना महामारी मुळे देशात निर्माण झालेल्या रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी तसेच आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या विचारांनी प्रेरित होऊन सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग व महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार दिनांक ६ जून २०२१ रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत मळगाव इंग्लिश स्कूल, मळगाव, तालुका- सावंतवाडी येथे करण्यात आलेले आहे. लस घेण्यापूर्वी ऐच्छिक रक्तदान किंवा शिबिरामध्ये रक्तदान करण्याचे आवाहन संबंधित संस्थेच्या वतीने करण्यात आलेले आहे.
रक्तदान करण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींनी पुढील नंबर वर संपर्क करून अगोदर नावे द्यावी जेणेकरून रक्तदाना दिवशी गर्दी न होता रक्तदात्यांना फोन करून वेळेत बोलवले जाईल.

संपर्क करण्यासाठी

सुनिल राऊळ – ८८०५१४१६११,

सुधिर राऊळ – ९७६५३२०९९०,

सुरज सावंत – ९४०५६९९८१८,

सिद्धू परब – ९४०४७४०८२२,

प्रणव माईणकर – ९९७०५५६४७३,

केदार देसाई – ७०३८५३९५९४,

रामचंद्र आईर – ७३५०२२१२१५

यांच्याशी संपर्क करावा. तसेच रक्तदात्यांनी सोशल डिस्टंसिंग पाळून, मास्क व्यवस्थित घालून संपर्क करून बोलावलल्यावर रक्तदान करण्यासाठी उपस्थित रहावे. असे आवाहन आयोजकां मार्फत करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 2 =