You are currently viewing चुकीच्या पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या “कृषी पशु-पक्षी प्रदर्शन” ला विरोध

चुकीच्या पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या “कृषी पशु-पक्षी प्रदर्शन” ला विरोध

शासन कार्य प्रणाली डावलून आणि चुकीच्या पद्धतीने प्रदर्शन झाले तर ठाम विरोध – रणजित देसाई

सिंधुदुर्ग :

जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने १५ मे च्या दरम्यान आयोजित करण्यात येत असलेले “कृषि पशु-पक्षी प्रदर्शन” चुकीच्या कालावधीत आणि चुकीच्या पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. तरी हे प्रदर्शन नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत घेण्यात यावे. चुकीच्या पद्धतीने आणि शासन कार्यप्रणाली डावलून हे प्रदर्शन झाले तर त्याला ठाम विरोध केला जाईल, अशी माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पप्या तवटे, रुपेश कानडे, संतोष साटविलकर, राजा धुरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा