You are currently viewing शिवकार्यात सर्वांनी सहभागी व्हावे- उमेश झिरपे.

शिवकार्यात सर्वांनी सहभागी व्हावे- उमेश झिरपे.

शिवकार्यात सर्वांनी सहभागी व्हावे- उमेश झिरपे.

वैभववाडी

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजानी गड-किल्यांच्या साहाय्याने मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले. छ.शिवाजी महाराज्यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधुन अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने दिनांक २६ जानेवारी, २०२४ रोजी महाराष्ट्रातील ३५० किल्ल्यांवर तिरंगा ध्वज, भगवा ध्वज फडकवणे, शिवप्रतिमा पूजन व स्वच्छतेची शपथ घेणे अशा एका अभिनव उपक्रमाचे आयोजन केले आहे. या अभिनव शिवकार्यात महाराष्ट्रासह जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष श्री.उमेश झिरपे यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील गड- किल्ले व त्यांची जबाबदारी यांचा आढावा घेण्यासाठी आँनलाईन सभा मंगळवारी रात्री अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. ऋषिकेश यादव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष श्री. उमेश झिरपे, श्री.राजन बागवे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष डॉ.कमलेश चव्हाण, उपाध्यक्ष डॉ.संजीव लिंगवत, सचिव प्रा.एस.एन.पाटील, डॉ. गणेश मर्गज, श्री.गणेश नाईक,प्रा. मिराशी सर, श्री. देसाई आदी मान्यवर सहभागी झाले होते. या सभेमध्ये मार्गदर्शन करताना उमेश झिरपे यांनी या अभिनव उपक्रमाची संकल्पना, स्वरुप व त्याचा हेतू याबाबत सविस्तर माहिती दिली. श्री.राजन बागवे यांनी या कार्यक्रमाला लागणारे साहित्य लवकरच सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेकडे वेळेत पोच करण्यात येईल. जिल्ह्यातील शिवप्रेमी, दुर्गप्रेमींनी उपक्रमात सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावा अशी विनंती केली. सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेने दि.२६ जानेवारीच्या उपक्रमाची चांगली तयारी केली असून जिल्ह्यातील समविचारी संस्था, व्यक्ती, शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, ग्रामपंचायत, माजी सैनिक, शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थी, स्थानिक ग्रामस्थ यांनी या उपक्रमात सहभागी झाले पाहिजे. सिंधुदुर्गातील एकूण ३८ किल्ल्यांपैकी बऱ्याच किल्ल्यांची जबाबदारी पूर्ण झालेली असून इतर सर्व किल्ल्यांवर हा कार्यक्रम कसा करता येईल याचा सर्वांनी विचार करून नियोजन करावे. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन श्री. ऋषिकेश यादव यांनी केले. यावेळी डॉ.कमलेश चव्हाण, डॉ.गणेश मर्गज यांनीही कार्यक्रमाच्या तयारीची माहिती दिली. शेवटी संघटनेचे सचिव प्रा.एस.एन.पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 5 =