You are currently viewing केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्स्फूर्त स्वागत

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्स्फूर्त स्वागत

ढोल ताशे, लेझिम पथकाने खारेपाटण दणाणले

कणकवली

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा खारेपाटणमध्ये दाखल झाली आहे. त्‍यांच्या स्वागतासाठी भाजपचे हजारो कार्यकर्ते खारेपाटणच्या महामार्गावर जमा झाले आहेत. राणेंसोबत माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, यात्रा संयोजक प्रमोद जठार, भाजपचे माजी जिल्‍हाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्‍हाध्यक्ष राजन तेली यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित आहेत. फटाक्‍यांच्या आतषबाजीत तसेच ढोल ताशांच्या गजरात राणेंचे खारेपाटणनगरीत स्वागत झाले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा