You are currently viewing सावंतवाडी गरड परिसरात दुचाकीला झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी 

सावंतवाडी गरड परिसरात दुचाकीला झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी 

सावंतवाडी

सावंतवाडी गरड परिसरातील त्रिवेणी प्रसाद पेट्रोल पंप समोर दोन दुचाकित धडक होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. पेट्रोल भरून दुचाकीने रस्ता ओलांडताना समोरून भरधाव येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने हा अपघात घडला.यात कृष्णाजी उर्फ किसन महादेव गुरव ( वय – ४९,रा. माजगाव खोतवाडा )हे जखमी झाले आहेत.त्यांना तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.प्रार्थमिक उपचार करून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.ही सर्व घटना पेट्रोल पंपच्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + 12 =