You are currently viewing भाग्योदय लेखणीचा साहित्यिक मंच आयोजित राष्ट्रीय कविसंमेलनाकरीता नावनोंदणी सुरू

भाग्योदय लेखणीचा साहित्यिक मंच आयोजित राष्ट्रीय कविसंमेलनाकरीता नावनोंदणी सुरू

 

साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि लिखाणातून प्रबोधन घडावे अशा सामाजिक हेतूनिशी ,पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तसेच भाग्योदय लेखणीचा साहित्य मंच, गुजरात यांच्या संयुक्त विद्यमाने निमंत्रित कवींचे पहिले राष्ट्रीय काव्य संमेलन, पुरस्कार वितरण सोहळा आणि स्नेहमेळावा असे भव्य दिव्य आयोजन मंचाच्या संस्थापिका/संचालिका मा.सौ. भाग्यश्री राकेश बागड यांनी गुजरात येथील वलसाड या ठिकाणी रविवार दिनांक २९ मे रोजी, सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० दरम्यान निसर्गरम्य वातावरणात, समुद्र किनाऱ्यालगत स्वामी नारायण मंदिर, अक्षरम् हॉल येथे संपन्न होत असल्याचे योजले आहे. सदर संमेलनाकरीता मुंबईबरोबरच वडोदरा, सिल्वासा, ठाणे, पालघर, डहाणू, नवी मुंबई, पनवेल, अहमदनगर, नाशिक, रत्नागिरी, रायगड, पुणे, बीड, औरंगाबाद अशा महाराष्ट्र व गुजरात जिल्ह्यांतील विविध भागातून कवी-कवयित्रींनी नावनोंदणी केली आहे. त्याचप्रमाणे १५ मे २०२२ पर्यंत नावनोंदणी सुरू असल्याचे आवाहन समन्वयक श्री.राकेश बागड यांनी केले आहे. ज्यांना अजूनही नावनोंदणी करावयाची असल्यास त्यांनी त्वरीत आयोजकांशी संपर्क करावा. जेणेकरून संमेलनपूर्व नियोजन करण्यास सोपे व सुलभ होईल. पत्रकार आणि साहित्यिकांनी याची नोंद घ्यावी.

संपर्क:-
(आयोजक)
सौ. भाग्यश्री राकेश बागड
मो. 89750 37411
(समन्वयक)
श्री. राकेश बागड
मो. 90549 86741

प्रतिक्रिया व्यक्त करा