You are currently viewing मळगांव घाटीत रस्त्यावर पडलेल्य तेलामुळे अपघात होऊन अनेक दुचाकीस्वार जखमी

मळगांव घाटीत रस्त्यावर पडलेल्य तेलामुळे अपघात होऊन अनेक दुचाकीस्वार जखमी

सावंतवाडी

सावंतवाडी रेडी राज्यमार्गावरील मळगांव घाटीच्या धबधब्याच्या मुख्य वळणावर रिक्षातून नेत असलेले मोठे कॅन पडून खोबरेल तेल पडल्याने अनेक दुचाकीस्वारांचा अपघात झाला. ऑईल मूळे रस्ता निसरडा बनल्याने सुमारे २० ते २५ दुचाकी घसरून पडल्याने अनेक जण जखमी झाले. याबाबतची माहिती जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. तसेच निसरड्या रस्त्यावर माती टाकून रस्ता सुरक्षित केला. यानंतर माजी सभापती राजू परब यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. नगरपरिषेदेच्या बंबालाही पाचारण करण्यात आले. बांधकाम विभाग तसेच नगरपारिषदेचे कर्मचारीही उपस्थित झाले. पोलीस हवालदार महेश जाधव व धनंजय नाईक हे देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक व्यवस्था पाहिली. त्यानंतर निसरड्या रस्त्यावर माती व ग्रीट टाकण्यात आली. या नंतर स्वतः राजू परब तसेच मळगांव उपसरपंच हनुमंत पेडणेकर हे देखील घटनास्थळी दाखल झाले. तळवणेकर त्यांचे सहकारी व अन्य उपस्थित नागरिकांनी वाहनधारकांना सावकाश जाण्याच्या सूचना दिल्या.

मळगांव उपसरपंच बालबाल बचावले

तेल पडलेल्या रस्त्यावर वाहतूक सावकाश जावी यासाठी रस्त्यावर झाडांच्या फांद्या टाकून रस्ता सुरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी दरीच्या बाजूच्या फांदया तोडत असतात मळगांव उपसरपंच हनुमंत पेडणेकर ५ ते १० फूट दरीत कोसळले. केवळ नशीब बलवत्तर म्हणून त्यांचा पाय तेथील झाडाला अडकल्याने ते बाल बाल बचावले. त्यानंतर त्यांना सुरक्षित वर घेण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा