You are currently viewing कणकवलीतील स्ट्रीट लाईट साठी शिवसेनेच्या माध्यमातून ३० लाखाचा निधी – सुशांत नाईक 

कणकवलीतील स्ट्रीट लाईट साठी शिवसेनेच्या माध्यमातून ३० लाखाचा निधी – सुशांत नाईक 

शहराच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध…

कणकवली

शहरातील जनतेची सातत्याने मागणी असलेली महत्त्वाची दोन विकास कामे शिवसेनेच्या माध्यमातून मंजूर झाली आहेत. यामध्ये प्रामुख्याने कणकवली नगरपंचायत हद्दी मध्ये बिजलीनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते मराठा मंडळ रोड स्मशानभूमी पर्यंत स्ट्रीट लाईट बसवणे १० लाख व कणकवली शहरात महाडेश्वर दवाखाना ते नाथ पै नगर गणपती सान्या पर्यंत स्ट्रीट लाईट बसवणे २० लाख अशा एकूण ३० लाखाच्या नागरी सहाय्य योजने अंतर्गत विकास कामांना शासनाने मंजुरी दिली आहे. अशी माहिती नगरसेवक सुशांत नाईक यांनी दिली.

या संदर्भात गटनेते सुशांत नाईक व नगरसेविका मानसी मुंज यांनी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही विकास कामे मंजुरी संदर्भात मागणी केली होती. या मागणीनंतर नगर विकास मंत्र्यांनी तातडीने कणकवली शहरासाठी ३० लाखांच्या या दोन विकास कामांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे कणकवली शहरातील नेहमीच वर्दळ व रहदारीचा भाग असलेल्या बिजलीनगर व नाथ पै नगर भागात यामुळे रात्रीच्या वेळी रस्ते झळाळून निघणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + ten =