You are currently viewing शाळा-कॉलेजच्या वेळेनुसार एस.टी.बस फेऱ्या नियमित कराव्यात – वेंगुर्ले मनविसेनेची मागणी

शाळा-कॉलेजच्या वेळेनुसार एस.टी.बस फेऱ्या नियमित कराव्यात – वेंगुर्ले मनविसेनेची मागणी

आगार व्यवस्थापकांना निवेदन

वेंगुर्ले

तालुक्यातील शाळा व कॉलेज व्यवस्थापन यांच्याशी समन्वय साधून एसटी बसच्या फेऱ्या नियमित व वेळेत सोडाव्यात तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्यांच्या वेळा या पूर्ण कालावधीत पूर्वी जशा नियमित होत्या त्याचप्रमाणे कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने वेंगुर्ले आगार व्यवस्थापक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
देशात त्याचप्रमाणे राज्यात कोरोना वैश्विक महामारी मुळे सन २०२१-२०२२ शैक्षणिक वर्ष उशिराने चालू होत आहे. दिनांक २ सप्टेंबर पासून इयत्ता १०वी/१२वी आणि 4 ऑक्टोंबर पासून ५वी/९वी/११वी चे वर्ग शासनाच्या आदेशाप्रमाणे नियमितपणे सुरू केलेले आहेत. त्याच प्रमाणे उच्च शिक्षण वर्ग सुद्धा 20 ऑक्टोंबर पासून सुरु होत आहेत. त्यामुळे एक-दीड वर्षापासून टाळेबंदीमुळे बंद असलेली एसटी बस सेवा सुद्धा आता पूर्ण क्षमतेने सुरू झालेली आहे. परंतु टाळे बंदीनंतर सुरु होणारी शाळा कॉलेजेस हे कोरोना चे नियम पाळून सुरू झाले असल्यामुळे शाळा-कॉलेजेस यांच्या वेळा या प्रत्येक वर्गवारीनुसार वेगवेगळ्या असल्याने वेंगुर्ले आगरातून सुटणाऱ्या बसच्या फेऱ्या यांच्या वेळा व शाळा कॉलेज यांच्या वेळा मध्ये काही ठिकाणी ताळमेळ बसत नाही. त्यामुळे विद्यार्थी यांचे अतोनात हाल होत आहेत.
म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने मार्फत आपणांस या निवेदनाद्वारे विनंती करीत आहोत, की एसटी बस फेऱ्या नियमित सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात आली. हे निवेदन विद्यार्थी सेना वेंगुर्ले तालुका अध्यक्ष महादेव तांडेल, वेंगुर्ले शाखा अध्यक्ष प्रथमेश नाईक तसेच अतुल पवार, अशोक पवार, विशाल बेहरे यांनी आज आगार व्यवस्थापक यांच्याकडे सादर केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा