You are currently viewing मनुष्यबळ विभाग प्रतिनिधी निवडणुकीत सिंधुदुर्गातील डॉ. अजित ठाकूर यांचे वर्चस्व

मनुष्यबळ विभाग प्रतिनिधी निवडणुकीत सिंधुदुर्गातील डॉ. अजित ठाकूर यांचे वर्चस्व

मनुष्यबळ विभाग प्रतिनिधी निवडणुकीत सिंधुदुर्गातील डॉ. अजित ठाकूर यांचे वर्चस्व

सावंतवाडी
अलीकडेच पुणे येथे पार पडलेल्या देशातील अग्रगण्य अश्या मनुष्यबळ विभाग प्रतिनिधी ची असलेली एन, आय, पी, एम, (
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ परसोनल मॅनेजमेंट) पुणे विभाग यांच्या द्वै वार्षिक निवडणुका मध्ये मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील म्हापण गावचे सुपुत्र डॉ. अजित ठाकुर यांच्या रेसिलांस एच आर पॅनेलने 10 पैकी 10 जागा जिंकून सत्तर टक्या पेक्षा जास्त बहुमत मिळविले आहे. ह्या निवडणुका प्रथमच ऑनलाईन मतदान पद्धतीने पार पडल्या. त्यामध्ये अध्यक्ष पदी इंदुरान्स कंपनीचे औद्योगिक संबंध विभाग प्रमुख श्री कल्याण पवार तर उपाध्यक्ष पदी मूळ म्हापन गावचे v सध्या कल्याणी स्टील, पुणे चे मनुष्यबळ विभाग प्रमुख डॉ अजित ठाकूर यांची निवड झाली आहे. सचिवपदी श्रीमती अमृता करमरकर यांची बिनविरोध तर सहसचिव पदी ॲड. प्रशांत क्षीरसागर, खजिनदार पदी डेक्कन स्किल डेव्हलपमेंट चे अध्यक्ष श्री. संजय झोपे यांचीनिवड झाली आहे. सन २०२३ ते २०२५ ह्या दोन वर्षासाठी संचालक मंडळ म्हणून डॉक्टर कीर्ती धारवाडकर,श्री. श्रेयस दाबके, श्रीमती वहिदा पठाण, श्री.किशोर केंचे, श्री.मुकुंद शर्मा याची प्रचंड बहुमताने निवड झाली आहे.

एन आय पी एम हे भारतातील मनुष्यबळ संसाधन म्हणजेच एच आर व आय आर अधिकाऱ्यांची एक महत्वाची सर्वात मोठी संस्था असून संपूर्ण भारतभर ५५ पेक्षा ज्यास्त शाखा असून पुणे, बारामती आणि पिंपरी चिंचवड येथे एक हजार पेक्षा ज्यास्थ आजीवन सदस्यत्व असलेले मनुषबळ विकास संबंधित अधिकारी आहेत. सदर सस्था ही केंद्र सरकार व राज्य सरकार यांना मानव संसाधन व विकास व रोजगार आणि कामगार कायदे ह्या सं द रर्भात मार्गदर्शन करीत असतात.
यावर्षी NATCON म्हणजेच वेगवेगळ्या साधारण 18 देशांमधील कारखान्यांचे मनुष्यबळ विभाग संदर्भातील अत्यंत नावाजलेल्या देशी आणि विदेशी वक्ते चे संमेलन ८ आणि ९ सप्टेंबर रोजी मेरीयात ह्या पंचतारांकित हॉटेल मध्ये पुण्या त होणार असल्याने या निवडणुकीला एक वेगळे महत्त्व प्राप्त झालेले होते.
न्याटकॉन चे संयोजक डॉ. भावे आणि एन आय पी एम चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विश्वेश कुलकर्णी यांनी नवीन संचालक मंडळाचे अभिनंदन केले आहे. डॉ. अजित ठाकुर हे एस एल देसाई विद्यालय पाट, कुडाळ हायस्कूल आणि सावंतवाडी येथील पंचम खेमरiज महाविद्यालयाचे माजी विध्यर्थी असून सिधुरुग्साठी त्यांची निवडून येणे भूषणावह ठरले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + 2 =