You are currently viewing आजगाव येथील श्री देव अग्निवेताळाचा वर्धापन दिन उद्या

आजगाव येथील श्री देव अग्निवेताळाचा वर्धापन दिन उद्या

आजगांव येथील सुप्रसिद्ध देवस्थान असलेल्या श्री देव अग्निवेताळाचा १६ वा वर्धापन दिन सोहळा ७ मे रोजी संपन्न होणार आहे. या सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात सकाळी महाभिषेक व लघुरुद्र, दुपारी १२ वाजता केळी ठेवणे, ओट्या भरणे, नवस बोलणे व फेडणे व महाआरती होणार आहे.तर

दुपारी १ वाजल्यापासून हाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता कै. बाबी कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा पौराणिक नाट्यप्रयोग होणार असून त्यानंतर रात्री १०.३० वाजता पालखी परिक्रमा होणार आहे. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यान येणार आहे. तरी या सोहळ्याला भाविक व भक्तगणांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री स्वयंभू देव अग्नि वेताळ देवस्थान तर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा