You are currently viewing गीत गायन स्पर्धेत नील बांदेकरची हॅट्रिक

गीत गायन स्पर्धेत नील बांदेकरची हॅट्रिक

१५ ऑगस्टचे औचित्य साधून आयोजित केलेल्या राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धेत, बांदा केंद्र शाळा नंबर एक मधील, इयत्ता तिसरीत शिकणारा विद्यार्थी, कु. नील नितीन बांदेकर यांने तिहेरी यश संपादन केले.
यात राणे इन्शुरन्स व डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग आयोजित, गीत गायन स्पर्धेत नील ने तॄतिय क्रमांक प्राप्त केला.
तर सावंतवाडी ,शाळा नंबर 4 आयोजित राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धेत, द्वितीय क्रमांक पटकावला.
तसेच कै. सुधाताई कामत शाळा सावंतवाडी आयोजित गीत गायन स्पर्धेत ,नील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला.
त्याच्या या यशात नीलचे आई-वडील श्री व सौ. गौरी नितीन बांदेकर , त्याचबरोबर बांदा केंद्र शाळेतील समस्त शिक्षक वृंद यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले.
विविध स्तरातून नील वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा