You are currently viewing भोसले पॉलिटेक्निकच्या नऊ विद्यार्थ्यांची फिलिप्स मध्ये निवड

भोसले पॉलिटेक्निकच्या नऊ विद्यार्थ्यांची फिलिप्स मध्ये निवड

सावंतवाडी

यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या तृतीय वर्ष इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील नऊ विद्यार्थ्यांची फिलिप्स हेल्थकेअर या वैद्यकीय उपकरणे बनविणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपनीत कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली. कंपनीच्या पुणे येथील प्रकल्पासाठी ही निवड झाली असून विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे – पल्लवी सापळे, गौरवी राऊळ, रोहित लोहार, आदित्य लांबर, हर्षद गवस, रत्नाकर नार्वेकर, दत्तप्रसाद सावंत, रोहन जंगले व अभिजीत पाताडे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, प्राचार्य गजानन भोसले व इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख दीपक पाटील यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा