You are currently viewing युवराज लखमराजे भोसले यांचा भाजप पदाधिकार्‍यांतर्फे सत्कार

युवराज लखमराजे भोसले यांचा भाजप पदाधिकार्‍यांतर्फे सत्कार

भाजपा प्रवेशाबद्दल समाधान व्यक्त करत दिल्या शुभेच्छा

सावंतवाडी

सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम राजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर त्यांचे सावंतवाडी शहरात आगमन होताच भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या. न.प.चे माजी सभापती सुधीर आडीवरेकर, उदय नाईक, ॲड. परिमल नाईक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी भाजपचे गोविंद प्रभू, सुमीत वाडकर, गणेश पडते, महिला आघाडी प्रमुख सुकन्या टोपले, मिसबा शेख, शंभू विर्नोडकर, नागेश जगताप आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा