You are currently viewing फोंडाघाट महावितरणच्या कार्यालयावर शिवसेनेची धडक

फोंडाघाट महावितरणच्या कार्यालयावर शिवसेनेची धडक

महावितरणचे शाखा अभियता यांना विचारला जाब

कणकवली

फोंडाघाट महावितरणचे शाखा अभियता वीज जोडणी करीता सर्वसामान्य जनतेकडून जादा रक्कमेची मागणी करत असल्याच्या तक्रारी जि. प. सदस्य संजय आंग्रे यांच्याकडे आल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थानी फोंडाघाट महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा नेत येथील शाखा अभियंता कांबळे याना जाब विचारला.

फोंडाघाटमधील एका ग्राहकाला कारखाना सुरू करण्यासाठी थ्री फेज कनेक्शनची गरज असल्याने त्यांनी आठ महिन्यापूर्वी फोंडाघाट महावितरण शाखेमध्ये अर्ज दिलेला होता त्यावेळी त्यांच्याकडे वीज जोडणी साठी सुरुवातीला आर्थिक मागणी करण्यात आली मात्र या ग्राहकाकडे ही रक्कम भरणे शक्य नसल्याने या वीज जोडणीला विलंब करण्यात आला मात्र काल परत त्यांच्याकडे यांच्याकडे किमान तीस हजाराची मागणी करण्यात आली ही बाब त्यांनी येथील जि प सदस्य संजय आंग्रे यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी फोंडाघाट परिसरातील किती वीज मीटर जोडणी प्रलंबित आहेत याची माहिती घेत आपल्या सर्व सहकाऱ्यांसह फोंडाघाट महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा नेला यावेळी त्यांच्या सोबत माजी जि. प. सदस्य संदेश पटेल,रंजन चिके,अनिल नानचे,राजेश शिरोडकर,अविनाश सापळे, राजू पटेल,भाई हळदिवे,राजन नानचे,बाबूं सावंत,ध्रुवा गोसावी यांच्यासह मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी नारकर यांनी केलेल्या आरोपावरून उपस्थित सर्वांनीच शाखा अभियंता कांबळे याना चांगलेच फैलावर घेतले तसेच येथील शिवसैनिक भाई हळदिवे यांनी या शाखा अभियंत्याकडून येथील ग्राहकांना चांगली वागणूक दिली जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली तर काही ग्रामस्थानी असे भ्रष्ट्राचारी अधिकारी येथे नकोच म्हणत त्यांच्या बदलीचीच मागणी केली. तसेच वीज बिल भरले नसल्याने ही ग्राहकांना समजून न घेता वीज तोडणीची केलेली कारवाई,व येथील शाखा अभियता आणि येथील वीज कर्मचारी यांच्यात समन्वय नसल्याचे मुद्दे यावेळी समोर आले.

दरम्यान यावेळी उपास्थित ग्रामस्थानी केलेल्या प्रश्नाना उत्तर देताना शाखा अभियंता कांबळे यांनी आपण कुणाकडून पैशाची मागणी केलेली नसून नारकर यांची वीज जोडणी कागदपत्राची पूर्तता करून दोन दिवसात करून देण्यात येईल असे सांगितले तसेच प्रलंबित घरगुती व व्यापारी वीज जोडणी ही लवकरात लवकर करून देण्याची हमी उपस्थित आंदोलकांना दिली असल्याने या वादावर तुर्तास तरी पडदा टाकण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा