You are currently viewing 2020–21 या वर्षांचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर

2020–21 या वर्षांचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर

परुळेबाजार ग्रामसेवक श्री शरद श्रीरंग शिंदे यांची पुरस्कारासाठी निवड

परुळेबाजार ग्रामसेवक श्री शरद श्रीरंग शिंदे यांना सन 2020–21 या वर्षांचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शासनाच्या विविध योजनाची अमलबजावणी ग्रामीण भागातील ग्रामस्थांनपर्यंत प्रभावी पणे पोहचवण्याचे काम करणाऱ्या ग्रामसेवकाना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन 2ऑक्टोबर गांधी जयंती दिनी गौरवण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून सन 2020-21 सालाचे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार शासनाकडून जाहीर करण्ययात आले. त्यात परुळेबाजार ग्रामसेवक शरद शिंदे यांचा समावेश आहे. प्रत्येक तालुक्यातील एक ग्रामसेवक यांची पुरस्कार साठी निवड होते. परुळेबाजार ग्रामसेवक शरद शिंदे यांची निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे. त्यांनी यापूर्वी सागरतीर्थ व भोगवे ग्रा पं येथे विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. विविध अभियाने पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने प्रभावी पणे राबवून विविध पुरस्कार मिळवून देण्यात हातभार लावला आहे. सध्या ते परुळेबाजार येथे कार्यरत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा