इंदिरा गांधी व राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसतर्फे अभिवादन
राजेंद्र मसुरकर यांची काँग्रेस वैद्यकीय मदत कक्ष सेलच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती; तालुका काँग्रेसच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान
सावंतवाडी :
भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी आणि वीरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त तालुका काँग्रेसच्या वतीने उभा बाजार येथील जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानच्या कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजेंद्र मसुरकर यांनी स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जीवनकार्याची आणि देशाच्या विकासातील त्यांच्या योगदानाची माहिती उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांना दिली.
दरम्यान, काँग्रेस वैद्यकीय मदत कक्ष सेलचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड यांनी स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून राजेंद्र मसुरकर यांची काँग्रेस वैद्यकीय मदत कक्ष सेलच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. या नियुक्तीबद्दल तालुका काँग्रेसच्या वतीने राजेंद्र मसुरकर यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रदेश काँग्रेस सदस्य तथा काँग्रेस नेते ॲड. दिलीप नार्वेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच जिल्हा काँग्रेस सरचिटणीस रवींद्र म्हापसेकर, महिला जिल्हा काँग्रेसच्या साक्षी वंजारी, तालुका काँग्रेस अध्यक्ष अभय मालवणकर, शहर काँग्रेस अध्यक्ष ॲड. राघवेंद्र नार्वेकर, जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा कायदेशीर सल्लागार ॲड. समीर वंजारी, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष सौ. सुमेदा सावंत, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक तौकीर शेख आदी मान्यवरांनी इंदिरा गांधी यांच्या देशसेवेचा आणि त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेत आपले विचार मांडले.
यावेळी कौस्तुभ पेडणेकर, संजय लाड, संदीप सुखी, अरुण भिसे, अशोक कोरगावकर, गणेश भिसे, विष्णू पेडणेकर, संतोष कासकर, पीटर फर्नांडिस, सुधीर मल्हार, संतोष तावडे, बाळा नमसी, विनायक नमसी, आफताब हेरेकर, परिवहन वरिष्ठ सहाय्यक अधिकारी विजय ओटवणेकर, आनंद आयरे, वरद आनंद परुळेकर, ज्येष्ठ नेते अन्वर खान, रामू गवळी, संतोष पेडणेकर, बाळा नाईक, राजू सावंत, सुभाष नाईक, शशिकांत गोसावी, उल्हास साठेलकर यांच्यासह काँग्रेसप्रेमी नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
