You are currently viewing माजी आमदार जीजी उपरकर यांनी घेतले सावंतवाडी  मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, राजकीय मंडळींच्या घरच्या बाप्पांचे दर्शन

माजी आमदार जीजी उपरकर यांनी घेतले सावंतवाडी  मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, राजकीय मंडळींच्या घरच्या बाप्पांचे दर्शन

सावंतवाडी

मनसेचे राज्य सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी काल सावंतवाडी तालुक्यात मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सामाजिक व्यापारी व इतर राजकीय मंडळींच्या घरी गणेश दर्शन घेतले.  त्याचप्रमाणे गुळदुवे येथील दहावीच्या परीक्षेत उत्तम प्रकारे गुणसंख्या घेऊन उत्तीर्ण झालेल्या मुलांचा सत्कार श्री उपरकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देत करण्यात आला. सदर सत्कार हा म.न.लॉ.से सावंतवाडी तालुकाध्यक्ष राजेश मामलेकर यांनी आयोजित केला होता.

यावेळी सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार,  बांदा शहराध्यक्ष बाळा बहिरे,  संतोष भैरवकर,  उपतालुकाध्यक्ष प्रकाश साटेलकर,  विभाग अध्यक्ष संदेश शेट्ये,  आरोस विभागअध्यक्ष मंदार नाईक,  मनलॉसे तालुकाध्यक्ष राजेश मामलेकर,  विभाग अध्यक्ष नाना सावंत,  डिंगणे ग्रा.प आदेश सावंत,  इन्सुली शाखाअध्यक्ष सुरेंद्र कोठावळे,  प्रवीण आरोसकर,  नंदू परब,  मुकुंद धारगळकर,  निलेश मुळीक आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + nine =