You are currently viewing श्री देव कर्पे महापुरूषाचा बारावा वर्धापनदिन

श्री देव कर्पे महापुरूषाचा बारावा वर्धापनदिन

गोमान्तक व महाराष्ट्र या राज्यातील कर्पे घराण्याचे दैवत असलेल्या श्री देव कर्पे महापुरूष (कर्पे पिंपळ देवस्थान) या पेडणे (गोवा) येथील देवतेचा बारावा वर्धापनदिन धार्मिक कार्यक्रमासह वैशाख शु ६ शनिवार दि ७ मे रोजी मोठया थाटात व भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न होणार आहे या निमित्त अभिषेक,धार्मिक विधी,महाप्रसाद त्यानंतर तीर्थ प्रसाद अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.


सतराव्या शतकातील असलेले अतिशय पुरातन कर्पे महापुरुषाचे हे स्थान प्रचिती व दिव्य आविष्कारांनी भरलेले असून नवसास पावणारी व सर्वाची मनोकामना पूर्ण करणारी देवता अशी तिची ओळख आहे
दरवर्षी विजयादशमीच्या एकादशीच्या पहाटेला पेडणे(गोवा) येथील रवळनाथ,भूतनाथ,यांची तरंगे या देवतेला भेटायला येतात तेथे त्यांची कर्पे घराण्याच्या व्यक्तीकडून श्रीमंत पूजा केली जाते
तरी या सोहळयाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव कर्पे महापुरूष (कर्पे चा पिंपळ देवस्थान) कमिटी तर्फे करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − nine =