You are currently viewing वेंगुर्ला नगरपरिषदेतील नगराध्यक्ष केबिन मधील पीओपी सिलिंग कोसळले.
निकृष्ठ कामाची चौकशी करावी - नगरसेविका सौ.सुमन निकम यांची मागणी

वेंगुर्ला नगरपरिषदेतील नगराध्यक्ष केबिन मधील पीओपी सिलिंग कोसळले.

वेंगुर्ला नगरपरिषद या इमारतीतील नगराध्यक्ष केबिन मध्ये करण्यात आलेले पीओपी सिलिंग मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास खाली पडले. यामुळे नगरपालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

गेल्या वर्षभरात लाखो रुपये खर्च करून नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मुख्याधिकारी केबिन मध्ये ठेकेदाराकडून पीओपी सिलिंगचे काम करण्यात आले होते. सुमारे एक महिन्या पूर्वी याच नगराध्यक्ष यांच्या केबिनमधील पीओपी सीलिंग एक भाग तुटून खाली पडला होता. त्याची डागडुजी करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्याच नगराध्यक्ष केबिनमधील पीओपी सीलिंग चा भाग कोसळला आहे त्यामुळे नगरपरिषदेचे नुकसान झाले आहे. या लोकांनी जबाबदार असणाऱ्या संबंधितावर मुख्याधिकारी यांनी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करावा.

सदरचे काम निकृष्ठ झालेले असून या कामाची चौकशी करावी अशी मागणी वेंगुर्लेच्या नगरसेविका सौ.सुमन निकम, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डाॅ.अमितकुमार सोंडगे यांच्याकडे केली आहे. यावेळी सदर नुकसानीची पाहणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख आबा कोंडस्कर, सुनिल डुबळे, नगरसेविका सुमन संदेश निकम, शहरप्रमुख अजित राऊळ, सचिन वालावलकर, शहर समन्वयक विवेक आरोलकर, हेमंत मलभारी, प्रितम सावंत आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या ऑफिस ला ५४ लाख नगराध्यक्ष व तात्कालीन मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी नगरसेविका सौ.सुमन संदेश निकम व संदेश निकम यांना कुठेल्याही प्रकारची कल्पना न देता कार्यालयाचे उद्घाटन करून बोगस कॉन्ट्रॅक्टर नेमून भोगस काम केले आहे. यासाठी जिल्हा अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीवर मालवणचे मुख्याधिकारी जयेंद्र जावडेकर यांची नेमणूक करून चौकशी केली होती. त्या चौकशी मध्ये तत्कालीन मुख्याधिकारी वैभव साबळे यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला परंतु भोगस काम आहे हे नियतीने दाखवून दिले आहे. याचाच एक भाग म्हणून १८ आॅगष्ट रोजी रात्री नगराध्यक्ष यांची केबीनचे पुर्णपणे पी.यु.पी.पडून वेंगुर्ला नागरिकांचे कष्टाचे लाखो रुपये तत्कालीन मुख्याधिकारी वैभव साबळे याच्या भ्रष्टाचाराच्या कारभारामुळे वाया गेले आहेत. याची आता तरी चौकशी जिल्हा अधिकारी यांनी उच्चस्थरीय अधिकारी नेमून चौकशी करून वेंगुर्ला नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी वेंगुर्ला नागरिकात व बाजारपेठत होत आहे.

यासंदर्भात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, सावंतवाडी मतदार संघाचे विद्यमान आमदार दिपक केसरकर यांच्याकडे देऊन अधिवेशनामध्ये विषय पटालवर घेऊन तत्कालीन मुख्याधिकारी वैभव साबळे यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करून संपुर्ण झालेल्या भोगस कामाच्या नुकसानीची वेंगुर्ला नगरपरिषदेचे माजी मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्याकडून करण्यात यावी अशी मागणी दिपक केसरकर यांच्याकडे सर्व पुराव्यानिशी करणार आहे असे यावेळी माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − fifteen =