You are currently viewing छत्रपती शिवाजी महाराज चौकात तातडीने पॅचवर्क करा – समीर नलावडे

छत्रपती शिवाजी महाराज चौकात तातडीने पॅचवर्क करा – समीर नलावडे

कणकवली

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पॅचवर्क तत्काळ न केल्यास हायवे ठेकेदार दिलीप बिल्डकॉन वर हल्लाबोल करण्याचा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिला आहे. छत्रपती चौकातील शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या जुन्या जागेवरील पॅचवर्क अजूनही हायवे ठेकेदाराने केलेलं नाही. खड्डेमय असलेल्या या जागेत डांबर सिलकोट मारून पॅचवर्क करणे अत्यावश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नवीन जागी बसवून ६ महिने झाले तरी अद्याप सर्व्हिस रोडवरील पुतळा हटविलेल्या जागेचे पॅचवर्क करण्यात आलेले नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता व्यक्त होत आहे. अपघाताची दुर्घटना होण्याआधीच तात्काळ पॅचवर्क करा अन्यथा हल्लाबोल करण्याचा इशारा नगराध्यक्ष नलावडे यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + 20 =