You are currently viewing वजराट येथे झोपाळ्यावरून पडल्याने ११ वर्षीय मुलीचा मृत्यू…

वजराट येथे झोपाळ्यावरून पडल्याने ११ वर्षीय मुलीचा मृत्यू…

वेंगुर्ले

झोपाळ्यावर झोका घेत असताना जमिनीवर कोसळून अकरा वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना काल सायंकाळच्या सुमारा वजराट येथे घडली. कार्तिकी शेखर परब (रा.परबवाडी), असे तिचे नाव आहे. याप्रकरणी वेंगुर्ले पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
वजराट येथील कार्तिकी परब ही सायंकाळी झोपाळ्यावर बसून झोका घेत होती. झोका घेत असताना तिचा तोल जाऊन ती खाली पडली. खाली पडल्यावर बेशुद्ध झाल्याने तिचे काका राजेंद्र परब यांनी तिला तात्काळ वेंगुर्ले येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासल्यानंतर ती मयत झाल्याचे सांगितले. याबाबत राजेंद्र परब यांनी वेंगुर्ले पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पालकर करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − eight =