You are currently viewing मळगावत कोरोना प्रतिबंधक ऊपक्रम…

मळगावत कोरोना प्रतिबंधक ऊपक्रम…

सभापती राजु परब व मळगाव ग्रांपचायत उपक्रम.

संजु विरनोडकर टिमचे कार्य…

सावंतवाडी
कोरोनाचे मिळालेले रुग्ण व मृत्युचे प्रमाण यावर मळगाव ग्रामस्थांचे मनोधर्य खचले होते. चिंताग्रस्त नागरीकांची निर्जतुकीकरण फवारणीची मागणी सातत्याने होत होती. राजु परब यानी संजु विरनोडकर टिमच्या सहकार्याने योजना आखली. त्याप्रमाणे मळगावातील प्रमुख वर्दळीची व सार्वजनिक ठिकाणी निर्जतुकीकरण संजु विरनोडकर टिम ने केले. वाडीवाडीवर ज्या ज्या ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण सापडले त्या त्या ठिकाणी व परिसरात आणि रस्त्यांवर निर्जतुकीकरण करण्यात आले.
तलाठी आँफिस, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, हायस्कुल, दवाखाने, एस.टी. स्टँड, मळगाव बाजारपेठ, रेशन दुकान, सिंधुदूर्ग जिल्हा बँक ATM.पुर्ण सस्तावाडी, पोलिस चेकपोस्ट, लाकुड गिरणी, अश्या महत्वाच्या ठिकाणी हा ऊपक्रम राबवीण्यात आला. यात महिलाही सहभागी झाल्या. सौ.गीता परब यानी स्वःता फवारणीत भाग घेवून वेगळा आदर्श निर्माण केला. या निर्जंतुकीकरणात सौ.गीता परब, रंजना राऊळ, संतोष तळवणेकर, आकाश मराठे, तुषार बांदेकर, मानसिंग शिरोडकर, मयुर सुभेदार, राजन राउळ, सचिन घाडी, शेखर राऊळ, शिवप्रसाद गावकर, निलेश कुडव, राजन राउळ, दाजी सावंत, हनुमंत पेडणेकर व ग्रामस्थानी सहभाग घेतला. मळगाव ग्रामस्थानी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करुन संजु विरनोडकर व राजु परब यांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + 3 =