You are currently viewing बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचा चार्ज डॉ. सारंग यांच्याकडे सुपूर्द; आ. नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश

बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचा चार्ज डॉ. सारंग यांच्याकडे सुपूर्द; आ. नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश

बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचा चार्ज डॉ. सारंग यांच्याकडे सुपूर्द; आ. नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश

बांदा

आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला वैद्यकीय अधिकारी मिळाले आहेत. मोरगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांच्याकडे बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचा चार्ज देण्यात आला आहे. बांदा भाजपच्या पदाधिकार्‍यांनी आ. नितेश राणे यांचे लक्ष वेधल्यानंतर दुसर्‍याच दिवशी आरोग्य केंद्राला वैद्यकीय अधिकारी मिळाले आहेत. त्यामुळे उपसरपंच जावेद खतीब यांनी आ. नितेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांची भेडशी येथे प्रशासकीय बदली झाली आहे. गेले दीड महिने हे पद रिक्त आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय होत होती. स्थानिक लोकप्रतिनिधींकडे याबाबत वाढत्या तक्रारी होत्या. त्यामुळे उपसरपंच जावेद खतीब यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आमदार नितेश राणे यांची भेट घेऊन लक्ष वेधले होते.
आमदार नितेश राणे यांनी सीईओ प्रजित नायर यांना बांदा पीएचसीमध्ये तातडीने वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासकीय स्तरावर तातडीने दखल घेत मोरगाव वैद्कीय अधिकार्‍यांकडे बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचा चार्ज देण्यात आला आहे. तसे आदेश सीईओ प्रजित नायर यांनी दिले आहेत. आज दुपारी डॉ. सारंग चार्ज घेतील असे वैद्यकीय सुत्रांकडून सांगण्यात आले. आ. नितेश राणे यांचे बांदा परिसरातील नागरिकांकडून आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

 

*संवाद मिडिया*

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031

*Advt link*
https://sanwadmedia.com/104937/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा