You are currently viewing वैभववाडी पाठोपाठ कणकवली तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ, तरळेत पहाटेच्या सुमारास दुकाने फोडली

वैभववाडी पाठोपाठ कणकवली तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ, तरळेत पहाटेच्या सुमारास दुकाने फोडली

लागोपाठच्या दुकानफोडयांनी पोलिसांसमोर तपासाचे आव्हान

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्ह्यात चोरट्यांचा अक्षरशः धुमाकूळ सुरू असून, वैभववाडी तालुक्यात काल चोरट्यांनी धुडगूस घातल्यानंतर आज सोमवारी पहाटे तरळे बाजारपेठेतील तब्बल 12 हून अधिक दुकाने चोरट्यांनी फोडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात करून एका दुकानदाराची तब्बल 4 लाखाहून अधिक कॅश चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. दरम्यान आज सकाळी ही बाब निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ बाजारपेठेतील धाव घेतली. मात्र चोरट्यांनी अनेक दुकानांच्या गल्ल्यावर डल्ला मारला. चोरट्यांनी रेकी करून ही दुकाने फोडली असण्याची शक्यता आहे. कारण ज्या दुकानांच्या आतील भागात घरे आहेत अशी दुकाने फोडली नसल्याची बाब प्रकर्षाने समोर येत आहे. पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर हे देखील सोमवारी पहाटेपासूनच तरळे येथे दाखल झाले असून, त्यांच्याकडून कसून शोध सुरू आहे. वैभववाडी नंतर कणकवली त्यापाठोपाठ आता तरळे मध्ये देखील चोरट्यांनी दुकाने फोडल्याने पोलिसांसमोर आता तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे. घटनेची माहिती समजताच येथील व्यापाऱ्यांनी गर्दी केली होती. मात्र खुलेआमपणे चोरट्यांचा वावर सुरू असताना पोलिसांकडून आता ठोस उपाय योजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे. बाजारपेठेमध्ये सीसीटीव्ही द्वारे चोरट्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी दिली. पहाटे तीन ते साडेचार या वेळेत बुरखाधारी चोरटे सीसीटीव्हीत कैद झाल्याचे समोर आले आहे. मात्र आता पुढील चोर्‍या टाळण्यासाठी या चोरट्यांना गजाआड करण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर असणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + 10 =