You are currently viewing सोमवारपासून जिल्ह्यात तालुकावार आरोग्य तपासणी शिबिरे

सोमवारपासून जिल्ह्यात तालुकावार आरोग्य तपासणी शिबिरे

सिंधुदुर्गनगरी 

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत सोमवार दि. 18 ते 22 एप्रिल या कालावधीत तालुकावार आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

          सोमवार दि. 18 एप्रिल रोजी जिल्हा महिला व बाल रुग्णालय कुडाळ आणि ग्रामीण रुग्णालय वैभववाडी, मंगळवार दि. 19 एप्रिल रोजी ग्रामीण रुग्णालय वेंगुर्ले आणि ग्रामीण रुग्णालय देवगड, बुधवार दि. 20 एप्रिल रोजी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी व ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग, गुरुवार दि. 21 एप्रिल रोजी ग्रामीण रुग्णालय मालवण आणि शुक्रवार दि. 22 एप्रिल रोजी उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे या शिबिरांचे आयोजन केले आहे.

या शिबिरात डिजिटल हेल्थ आयडी काढणे, आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढणे, सर्व आजारांची तपासणी, चाचणी व उपचार, टेलिकम्युनिकेशन, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजार, गर्भनिरोधक साधनांचा वापर कसा करावा याबाबत समुपदेशन करण्यात येणार आहे.

या शिबिराचा लाभ घेण्यासाठी वैध शिधापत्रिका, फोटो ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड व शासन फोटो असलेले ओळखपत्र इत्यादी सोबत घेऊन यावे. त्याचप्रमाणे आधारकार्ड लिंक असलेला भ्रमणध्वनी क्रमांक आणावा. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा