इ.सी.एच.एसमध्ये माजी सैनिक, माजी सैनिक विधवांना वैद्यकीय सुविधा मिळणार

सिंधुदुर्गनगरी : 

दुसऱ्या महायुद्धातील शहिद, इमर्जन्सी कमिशन्ड ऑफिसर्स, शॉर्ट सर्विस कमिशन्ड ऑफिसर्स, प्रिमॅच्युअर्ड रिडायर्ड्स ज्यांना माजी सैनिक दर्जा प्राप्त आहे अशा माजी सैनिकांना इ.सी.एच.एसचे सदस्य देण्यास संरक्षण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.

        सदर मंजुरी देण्यात आल्यामुळे आता वरील पात्र माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांना इसीएचएस सदस्यात्वासाठी लकरात लवकर ऑनलाईन अर्ज सादर करावेत. सदस्यस्व प्राप्त झाल्यानंतर इसीएचएस द्वारे आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा प्राप्त होणार आहेत. त्यामुळे कल्याणकारी निधीतून देण्यात येणारी वेद्यकीय सुविधेची आर्थिक मदत दिनांक 1 ऑक्टोबर 2020 रोजीपासून बंद करण्यात आली असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी हे कळवितात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × five =