कळणेत कोरोना योध्याचा सन्मान…

कळणेत कोरोना योध्याचा सन्मान…

शहिद हवालदार नितीन परब यांच्या स्मृतिदिनानिमित्त करण्यात आले होते कार्यक्रमाचे आयोजन

दोडामार्ग

ज्यांनी कोरोनाच्या काळात आपल्या प्राणाची पर्वा न करता जनतेची सेवा बजावली अशा महनीय व्यक्तींचा सन्मान नूतन विद्यालय कळणे प्रशालेने केला. ही बाब कौतुकास्पद व उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन संस्थाध्यक्ष मोहनराव देसाई यांनी “कोरोना योध्यानचा गौरव” या कार्यक्रम प्रसंगी केला.
शहीद हवालदार कै. नितीन श्रीधर परब यांचा पाचवा श्रद्धांजली (स्मृतिदिन) कार्यक्रम नूतन विद्यालय कळणे प्रशालेने आयोजित केला होता. कै. नितीन परब यांच्या स्मृतिदिना निमित्त दरवर्षी नूतन विद्यालय विविध कार्यक्रमांचे आयोजन करते. यावर्षी कोरोना रोगाचा फैलाव संपूर्ण जगभर पसरला. लाखो लोकांनी आपला जीव गमावला. अशा महामारीच्या काळात प्राणाची बाजी लावून कोरोनावर मात केली. जनतेची सेवा बजावली. अशा महनीय व्यक्तींचा सत्कार “कोरोना योध्यानचा गौरव” मथळ्याखाली कार्यक्रम करण्यात आला. यावेळी कार्यक्रमा प्रमुख अतिथी नामांकित कपनीचे मॅनेजर शामसुंदर देसाई, सचिव गणपतराव देसाई, दोडामार्ग पोलिस उपनिरीक्षक कुलदीप पाटील, सरहद्द साप्ताहिकाचे कार्यसंपादक राजू तावडे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. रामदास रेडकर, सरपंचा जान्हवी देसाई, डॉ. मेघा दिगंबर अंधारी- कोकाटे, दोडामार्ग मंडळ अधिकारी राजन गवस, मुख्याध्यापक महेंद्र देसाई उपस्थित होते.
” कोरोना योध्यानचा गौरव” या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना संस्थाध्यक्ष मोहनराव देसाई म्हणालेत. कोविड हे महाभयंकर संकट आहे. कोविड महामारीने जगाला कसे जगायचे ते शिकवले आहे. महाभयंकर संकटावेळी समाजातील कित्येक योध्यानी आपल्या प्राणाची पर्वा न करता चांगले योगदान दिले. अशा व्यक्तीचे कार्य समाजासमोर आले पाहिजे. त्यांचा सन्मान झाला पाहीजे हा दृष्टिकोन समोर ठेऊन नूतन विद्यालयाने केलेला “कोरोना योध्यानचा गौरव ” हा कार्यक्रम कौतुकास्पद व उल्लेखनीय आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा नामांकित कंपनीचे मॅनेजर श्यामसुंदर देसाई म्हणालेत, नागरिकाचा सुरक्षिततेसाठी ज्यांनी अहोरात्र कार्य केले त्यांना योग्य न्याय नूतन विद्यालयाने दिला.

सत्कारमूर्ती
आरोग्य विभागातील ग्रामीण रुग्णालया दोडामार्ग चे वैद्यकीय अधिकारी डॉ मेघा दिगंबर अंधारी, आरोग्यसेविका सुरेखा गजानन भणगे, आरोग्यसेविका गायत्री गोविंद परब, दोडामार्ग पोलीस उपनिरीक्षक कुलदीप पाटील, पोलिस नाईक अनुराधा संतोष देसाई, सरपंचा मधरा नंदकुमार नाईक, तहसीलदार
कार्यालय दोडामार्ग, मंडळ अधिकारी राजन विठ्ठल गवस, मोरगाव आरोग्य सेविका पास्ते. यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी सरहद्द चे कार्यकारी संपादक राजू तावडे, डॉ. मेघा अंधारी, डॉ. रामदास रेडकर, सरपंच मधुरा नाईक, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक महेंद्र देसाई, सूत्रसंचालन विठ्ठल दळवी तर आभार शिक्षक प्रशांत राऊळ यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा