You are currently viewing प्रवाशांसह आगारप्रमुख ही चिखलात..

प्रवाशांसह आगारप्रमुख ही चिखलात..

बस स्थानक अभियंता निरुत्तर

कुडाळ :

कुडाळ शहर बसस्थानक आवारात निर्माण झालेल्या चिखलाच्या साम्राज्यामुळे आणि पावसाच्या पाण्यामुळे कुडाळ तालुक्यातील येणाऱ्या नागरिकांना प्रवाशांना त्याचा त्रास होत होता. त्याकरता कुडाळ शहर भाजपच्या वतीने कुडाळ बस स्थानकाचे आगार प्रमुख श्री सुजित डोंगरे यांना चिखलात उभे करून निवेदन देण्यात आले व प्रवाशांना कसा त्रास होतो याचे उदाहरण याची देही याची डोळा दिसावे. यासाठी प्रत्यक्ष त्या ठिकाणी येऊन जाब विचारण्यात आला आणि त्यांना धारेवर धरण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत बसस्थानकाचे अभियंता सुद्धा उपस्थित होते.

भाजपाच्या वतीने यावेळी तालुकाध्यक्ष विनायक राणे, शहराध्यक्ष राकेश कांदे, नगरसेवक सुनील बांदेकर, बंड्या सावंत, राजू बक्षी, चेतन धुरी, सुमित बांबुळकर, अविनाश  पाटील विलास वराडकर, शहर उपाध्यक्ष सुरेश राऊळ, बाळा कुडाळकर, राजवीर पाटील आदी भाजपा कार्यकर्ते सदर ठिकाणी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांना त्रास होऊ नये. म्हणून लवकरच चिखलाच्या ठिकाणी खडी टाकून व ग्रिट टाकून चिखल काढण्यात येईल. तसेच प्रवाशांसाठी व स्थानकाच्या पत्राशेड चे काम येत्या आठ दिवसाच्या आत मार्गी लावू असे आश्वासन आगारप्रमुख सुजित डोंगरे यांनी दिले. दिलेल्या कालावधीत सदर काम करण्यास दिरंगाई केल्यास भविष्यात वेगळे आंदोलन करावे लागेल असे भाजपा पदाधिकाऱ्यांनी ठणकावून सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × two =