मळगाव येथे रस्त्यावर भलेमोठे कोसळले  झाड…

मळगाव येथे रस्त्यावर भलेमोठे कोसळले झाड…

सावंतवाडी-शिरोडा मार्गावरील घटना; वाहतूक विस्कळीत…

सावंतवाडी

येथील शिरोडा-रेडी मार्गावर मळगाव येथे भलेमोठे झाड कोसळले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही घटना आज सव्वा अकराच्या सुमारास मळगाव येथील वाकलमाता स्टील सेंटरच्या समोर घडली. याबाबतची माहिती शिवसेनेचे युवा नेते अमेय तेंडोलकर यांनी दिली.
झाडाचा बुंधा मोठा असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ ते हटवावे, अशी त्यांनी मागणी केली आहे. तसेच दोन्ही बाजूने येणाऱ्या प्रवासाने जुन्या मार्गाचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा