You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांना पितृशोक 

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांना पितृशोक 

वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. मनीष दळवी यांचे वडिल होडावडा सोसायटीचे माजी चेअरमन, आंबा बागायतदार, पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी श्री. प्रकाश सेनापती दळवी वय ७५ यांचे शुक्रवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास बांबुळी गोवा येथे उपचारादरम्यान निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे सुना, नातवंडे, एक विवाहित मुलगी, जावई असा परिवार आहे. राजकारणात आणि समाजकारणात त्यांचा सहभाग होता. दुपारी होडावडा येथील स्मशानभूमी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा