You are currently viewing इचलकरंजीत धार्मिक कार्यक्रमांनी रामनवमी उत्सव उत्साहात साजरा

इचलकरंजीत धार्मिक कार्यक्रमांनी रामनवमी उत्सव उत्साहात साजरा

पहाटेपासून भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

इचलकरंजी शहरातील गावभाग राम मंदिर यासह विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांनी रामनवमी उत्सव
उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने मंदिरात श्रींच्या मूर्तीची विधीवत पूजाअर्चा ,जन्मकाळ सोहळा पार पडला.तसेच पहाटेपासून दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारी व शासनाच्या कडक निर्बंधांमुळे धार्मिक सण ,उत्सव साजरा करण्यावर ब-याच मर्यादा आल्या होत्या.पण , काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने धार्मिक सण , उत्सव साजरा करण्यावर असलेले निर्बंध शिथिल केले आहेत.त्यामुळे पुन्हा धार्मिक सण , उत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसू लागला आहे.आज रविवारी रामनवमी उत्सवानिमित्त याची प्रचिती दिसून आली.इचलकरंजी शहरातील गावभाग , सातपुते गल्ली यासह विविध ठिकाणी असलेले मंदिर व सार्वजनिक मंडळांच्या वतीने धार्मिक कार्यक्रमांनी रामनवमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.आला.यानिमित्ताने गावभाग परिसरातील राम मंदिरात
पहाटे मंदिरात उदय गोखले गुरुजी व देवदत्त गोखले गुरुजी यांनी श्रींच्या मूर्तीची काकड आरती ,
विधीवत पूजाअर्चा केली.यानंतर महापूजा विधी करुन
जन्मकाळ सोहळा ,आरती ,किर्तन तसेच राञी मंञपुष्प व आरती होवून या उत्सवाची समाप्ती करण्यात आली.
यावेळी उपस्थित भाविकांनी दर्शन घेवून प्रसादाचा लाभ घेतला.या उत्सवानिमित्त
पहाटेपासून दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा